तोंडात वारंवार फोड येतात? 'हे' आयुर्वेदिक उपाय करून तात्काळ मिळवा आराम
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता, शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता, शरीरात वाढलेली उष्णता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा अति मसालेदार पदार्थ खाल्यामुळे पोटात उष्णता वाढू लागते. पोटात वाढलेल्या उष्णतेमुळे तोंडात फोड येणे, तोंडात व्रण पडणे, अल्सर होणे, जिभेला लाल फोड येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तोंडात आलेल्या उष्णतेमुळे जिभेवर फोड आल्यानंतर कोणताही पदार्थ खाताना असह्य वेदना होऊ लागतात. पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तोंडात वेदना होतात. बऱ्याचदा तोंडात आलेले फोड कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध खातात. मात्र तोंडातील फोड आणखीनच वाढण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
तोंडात आलेले फोड किंवा अल्सर कमी करण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन अजिबात करू नये. बऱ्याचदा ब्रश करताना किंवा कोणताही पदार्थ वेदना होऊ लागतात. तोंड आल्यानंतर तोंडाच्या आतील भागात लाल आणि पांढऱ्या रंगाचे व्रण तयार होतात. यामुळे तोंडात सतत जळजळ, वेदना आणि वारंवार काहींना काही टोचतंय असे सुद्धा वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हे आयुर्वेदिक उपाय केल्यामुळे तोंडातील अल्सर कमी होण्यास मदत होईल.
आयुर्वेदामध्ये निर्गुंडीच्या पानांना विशेष महत्व आहे. या पानांचा वापर केल्यामुळे तोंडात आलेले लाल डाग किंवा अल्सर बरा होण्यास मदत होते. ही एक औषधी आयुर्वेदिक वनस्पती आहे. यामध्ये दाहक-विरोधी वेदनाशामक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागावर आलेले अल्सर बरे होण्यास मदत होते. शरीरसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यास निर्गुडीच्या पानांचा वापर करावा. निर्गुंडीची पाने तोंडाच्या अल्सरसाठी प्रभावी ठरतात.
निर्गुंडीची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोपात पाणी घेऊन ते पाणी गरम करून घ्या. त्यानंतर त्यात निर्गुंडीची पाने पाणी टाकून पाणी अर्धे होईपर्यंत व्यवस्थित उकळवा. त्यानंतर दिवसभरातून दोन ते तीन वेळा निर्गुडीच्या पाण्याच्या गुळण्या करा. या गुळण्या केल्यामुळे अल्सरच्या जळजळीपासून आणि वेदनांपासून कायमचा आराम मिळतो. या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय आरोग्यासंबंधित अनेक समस्यांवर निर्गुडीची पाने प्रभावी आहेत.
तोंडाच्या व्रणांवर उपचार:
मीठाच्या पाण्याने किंवा बेकिंग सोडाच्या द्रावणाने गुळण्या करणे, मध किंवा खोबरेल तेल लावणे, किंवा ओव्हर-द-काउंटर (over-the-counter) माउथवॉश वापरणे.
तोंडात अल्सर येणे म्हणजे काय?
तोंडाचे व्रण हे लहान, वेदनादायक फोड असतात जे तुमच्या ओठांच्या आत, गाल, जीभ किंवा हिरड्यांवर येऊ शकतात. ते सहसा पांढरे, पिवळे किंवा राखाडी रंगाचे आणि लाल रंगाच्या कडेने वेढलेले असतात. खाणे, पिणे किंवा बोलणे वेदनादायक असू शकते.
तोंडाच्या अल्सरची सामान्य लक्षणे:
तोंडाच्या आत, ओठांच्या आत किंवा जिभेवर लहान, वेदनादायक फोड किंवा व्रण दिसणे.व्रणांच्या भोवतीची त्वचा लालसर आणि सुजलेली असू शकते. व्रणांच्या मध्यभागी पांढरा किंवा पिवळा थर असू शकतो.