(फोटो सौजन्य: Instagram)
चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे जवळपास सर्वांनाच कमी वयातच अनेक आजारांना सोमोरे जावे लागत आहे. तरुणपणातच लोकांची हाडे खिळखिळी झाली आहेत आणि स्नायू कमकुवत होऊ लागले आहेत. आजकालच्या जगात तर लोकांना जास्त वेळ चालणंही कठीण झालं आहे. अशातच इंटरनेटवर फिटनेसची कमाल दाखवणाऱ्या आजोबांचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत ज्यांना पाहताच सर्वांना धक्का बसला. माहितीनुसार, त्यांना 100 वर्षे पूर्ण झाली असून इतकं वय असतानाही त्यांच्या फिटनेसला काही तोड नाही. या वयातही ते बॉडीबिल्डिंग करतात. त्यांचा हा फिटनेस आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. हे आजोबा अमेरिकेत राहत असून अँड्र्यू बोस्टिंटो असे त्यांचे नाव आहे.
प्रत्येकाला त्याने जास्त काळ जगावं आणि फिट राहवं अशी इच्छा असते. अशात स्वत:मध्ये काही चांगल्या सवयी लावून तुम्ही तुमचे आरोग्य सुधारु शकता आणि आयुष्यभर फिट राहू शकता. आपले वय वाढू लागले की आपल्याला अनेक आजार जडू लागतात. यामुळे अनेकदा व्यक्तीला चालणे देखील कठीण होते. तथापि, अमेरिकेत राहणारा अँड्र्यू बोस्टिंटो वयाच्या 100 व्या वर्षीही बॉडीबिल्डिंग करत आहे. अँड्र्यू हा जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डर आहे आणि सोशल मीडियावर त्याच्या फिटनेसमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. दिर्घकाळ जगण्यासाठी आणि स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अँड्र्यू कोणता आहार घेतो, त्याची दिनचर्या काय आहे हे आपल्याला माहिती असायला हवे.
ही आश्चर्याची गोष्ट आहे की, या वयातही 100 वर्षांचा अँड्र्यू बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतो. तो २० वर्षांचा असल्यापासून कसरत करत आहे. त्याचा 100 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर चार महिन्यांनी, अँड्र्यूने नॅशनल जिम असोसिएशन इंक. (एनजीए) फिजिक स्पर्धेत चॅम्पियनशिप बेल्ट जिंकला. अँड्र्यूच्या मते, त्याला हे करायला आवडते. अशा प्रकारे तो स्वतःला फिट आणि सक्रिय ठेवतो. वृद्धत्वाशी संबंधित समस्यांशिवाय त्याला इतर कोणत्याही समस्या नाहीत.
अँड्र्यूने सांगितले की, 13 वर्षांपासून त्याने व्यायाम करायला सुरुवात केली. त्याने कधीही वृद्धत्वाचा विचार केला नाही आणि आजही तो त्याच्या वयाचा विचार करत नाही. त्याने पार्कमध्ये कसरत सुरू केली आणि नंतर तो जिम्नॅस्टिक्स आणि हँड बॅलेन्सर बनला. त्याने 29 वर्षे अमेरिकन सैन्यात सेवा केली आणि वयाच्या 52 व्या वर्षी त्याला सिनियर मिस्टर अमेरिका पुरस्कार मिळाला. अँड्र्यूने त्याच्या तरुणपणी मॉडेलिंग देखील केले आहे.
फिटनेसचे रहस्य काय?
अँड्र्यू म्हणाला की जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे लक्षात ठेवावे लागेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. तंदुरुस्त राहण्यासाठी अँड्र्यू तरुणपणी जड प्रशिक्षण घेत असे आणि त्यासाठी तो हाय प्रोटीन, कमी कार्बयुक्त पदार्थ यांचा तो आहारात समावेश करत असे. तो दररोज २ सर्विंग्स फळे आणि २ सर्विंग्स सॅलड घेत असे आणि १५ ग्लास पाणी देखील पीत असे. पण आता तो जास्त खात नाही आणि प्रथिनेयुक्त पदार्थ घेतो. तो अंडी, दही, स्पॅगेटी आणि मीटबॉल्स खातो. त्याच्या फिटनेसचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे दारू आणि सिगारेटपासून दूर राहणे. हे दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत.
‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच
100 वर्षांच्या वयातही अँड्र्यू इतका तंदुरुस्त कसा?
100 वर्षांचा असूनही, अँड्र्यू अजूनही आठवड्यातून पाच ते सहा दिवस वेट ट्रेनिंग करतो. तो जिममध्ये जातो आणि सहा ते सात वेगवेगळे व्यायाम करतो. तो अजूनही डिप्स आणि चिन-अप्स करतो. या वयातही तो गुडघ्याचे पुश-अप्स आणि रेगुलर पुश-अप्स करतो. पण तो म्हणतो की तुम्ही नेहमी तुम्हाला जे आवडते ते करत राहिले पाहिजे. हे तुम्हाला आनंदी ठेवते आणि तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास देखील मदत करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






