रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' योगासने करावीत
जगभरात सगळीकडे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे तेलकट तिखट पदार्थ खाणे, अपुरी झोप, सतत काम करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या 21 व्या वर्षांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचं हृदयविकाराचा झटका येत आहे. या आजारांमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीनंतर सगळ्यांचीच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. हृदयविकारासह इतर आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे.
बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. हृदयविकाराचा झटका येण्यामागे काही कारण सुद्धा आहेत. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, शरीरातील अतिरिक्त वजन, वाढलेली चरबी इत्यादी गोष्टी हृदयविकाराचा झटका येण्यामागे कारणीभूत आहेत. हृदयविकाराच्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तसेच नियमित व्यायाम करणे, ८ तास झोप इत्यादी गोष्टींचा अवलंब करून निरोगी जीवनशैली जगणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने करावीत
सकाळी उठल्यानंतर नियमित सेतूबंधासन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सेतूबंधासन केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत. सेतूबंधासन आसनांचा सराव नियमित केल्यामुळे स्नायू आणि शरीरातील हाडे निरोगी राहण्यास मदत होते. हे आसन केल्यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते.
सेतूबंधासन केल्यामुळे शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. सतत एकजागेवर बसून काम केल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेली जीवनशैली सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत.
हे देखील वाचा: ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध
रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने करावीत
बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित वृक्षासन करावे. ताणतणाव कमी करून मन शांत ठेवण्यासाठी वृक्षासन करावे. हृदयविकाराच्या आजारापासून शरीराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित वृक्षासन करावे. या योगासनांचा नियमित सराव केल्यानंतर मानसिक आरोग्य सुधारते.
वृक्षासन करताना योगा मॅटचा वापर करावा. सगळ्यात आधी मॅटवर सरळ रेषेत उभे राहा. त्यानंतर डावा पाय खाली सोडून उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवून द्या. त्यानंतर शरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घेऊन हात डोक्यांवर ठेवून नमस्काराची मुद्रा करा. यामुळे पाठीचा कणा ताठ होईल.