शरीरात दिसणारी 'ही' लक्षणे देतात निरोगी आरोग्याचे संकेत
प्रत्येक व्यक्तीला कायमच निरोगी आणि हेल्दी आरोग्य हवे असते. हेल्दी आरोग्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी आहारात बदल केला जातो तर कधी जीवनशैलीत बदल करून आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडणे, शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे, मधुमेह आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करून शरीराची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वारंवार गॅस होतो? जाणून घ्या या मागील प्रमुख कारण आणि घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम
कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक लोक जीममध्ये जाऊन व्यायाम करणे, वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करणे यासोबतच जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल करतात. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात लक्षणे दिसू लागतात, त्याप्रमाणेच शरीर निरोगी असताना सुद्धा अनेक संकेत देतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निरोगी आरोग्याची शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणात आहोत. या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की तुमचे शरीर कायमच निरोगी आहे की नाही.
निरोगी आरोग्याचे संकेत म्हणजे लघवीचा रंग, तुमच्या लघवीचा रंग जर पांढरट किंवा फिकट पिवळा तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी आणि हायड्रेट राहते. तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य आहे. किडनीचे कार्य निरोगी असल्यानंतर लघवीचा रंग पांढरट किंवा फिकट पिवळा असतो, मात्र किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लघवीमध्ये फेस येणे, शरीरात सतत उद्भवणारी डिहायड्रेशनची समस्या इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.
शरीराची पचनक्रिया निरोगी असल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. त्यामुळे तुम्ही दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा शौचास जावे लागत असेल तर तुमची पचनक्रिया अतिशय उत्तम आहे. तुम्हाला पचनासंबंधित कोणतीही समस्या कधीच उद्भवणार नाही. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ हळूहळू निस्तेज आणि कोरडे पडून जातात. ओठ कोरडे झाल्यानंतर ओठांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे ओठ निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. ज्या व्यक्तींचे ओठ अतिशय मऊ आणि चमकदार असतील त्यांचे आरोग्य निरोगी आहे. फाटलेले ओठ डिहायड्रेशन किंवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होतात.
महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मासिक पाळी अतिशय महत्वाची आहे. नियमित येणारी मासिक पाळी निरोगी आरोग्याचे संकेत आहेत. मासिक पाळी आल्यानंतर जास्त वेदना न होणे, वेळेवर पाळी येणे आणि हार्मोन्स संतुलित असल्यास तुम्ही मासिक पाळी निरोगी आहे. याशिवाय जर तुमच्या शरीरावर आलेल्या जखमा वेळेवर भरत असतील तर तुम्ही रोगप्रतिकारशक्ती निरोगी आहे.