Hip Dislocation: हिप डिसलोकेशन म्हणजे काय? काय आहे प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार? (फोटो सौजन्य - istock)
हिप डिसलोकेशन म्हणजे मांडीचे हाड सॉकेटमधून बाहेर येणे. हिप डिसलोकेशन ही एक वैधकीय आणीबाणी आहे ज्यामुळे प्रचंड वेदना होतात आणि शारीरिक हालचालींवर मर्यादा येते. हिप डिसलोकेशन हे अपघात, आघात, पडल्यामुळे किंवा खेळातील दुखापतीमुळे होते. त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार पर्याय या बाबत डॉ आशिष अरबट, यांनी सांगितले आहे. डॉ आशिष अरबट ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पुणे येथे आहे. ते काय सांगतात बघुयात…
शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास शरीरातील पाणी होईल कमी
प्रकार काय ?
हिप डिसलोकेशनचे दोन मुख्य प्रकार आहेत.
कारणे काय?
दुखापत, कार अपघात, विशेषतः जेव्हा तुमचा गुडघ्यास मार बसतो, ज्यामुळे मांडीचे हाड त्याच्या सॉकेटमधून बाहेर पडते. उंचावरुन खाली पडल्याने देखील हिप डिसलोकेशन होऊ शकते हे प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येते कारण वयानुसार त्यांची हाडं कमकुवत झालेली असतात. ज्या खेळांमध्ये टक्कर होणे सामान्य असते जसे की फुटबॉल अशा खेळांमधील दुखापतीमुळे देखील गंभीर दुखापत होऊ शकते. ज्यांनी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली आहे त्यांच्यासाठी, किरकोळ दुखापत देखील कधीकधी कृत्रिम सांध्यांच्या डिसलोकेशनला कारणीभूत ठरू शकते. म्हणून, एखाद्याने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
लक्षणे कोणती ?
सूज येणे, जखम होणे, स्नायुंमधील बधीरपणा, मुंग्या येणे, मज्जातंतूंचे नुकसान, पायातील संवेदना कमी होणे आणि स्नायू आकुंचन पावणे यांचा समावेश आहे. हिप डिसलोकेशनमुळे तीव्र वेदना होऊ शकतात ज्यामुळे हालचालींवर मर्यादा येतात. प्रभावित पाय हा दुसऱ्या पायापेक्षा लहान दिसू शकतो किंवा मांडीच्या हाडाचा पुढील भाग चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे असामान्य दिसू शकतो. हाडांना, लिगामेंट्सना किंवा रक्तवाहिन्यांना अतिरिक्त नुकसान झाले आहे की नाही यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते.
हिप डिसलोकेशनच्या गुंतागुंतींमध्ये मज्जातंतूंचे नुकसान होऊन रक्त प्रवाह प्रतिबंधीत होतो ज्यामुळे हाडांच्या ऊती मृत पावतात व एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि संधिवातासारख्या समस्या उद्भवतात. हिप डिसलोकेशनवर उपचार करण्यासाठी आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
फ्रॅक्चर किंवा मज्जातंतूंना इजा झाल्यास, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. उपचारानंतर स्नायुंची ताकद आणि गतिशीलता पुनर्संचयित करण्यासाठी फिजीओ थेरपी नक्कीच फायदेशीर ठरते. जेव्हा फिजिओथेरपी, वेदना शामक औषधे किंवा चालताना आधार घेण्यासारख्या इतर उपचारांमुळे रुग्णाला वेदना कमी होण्यास आणि गतिहीनतेवर मात करण्यास मदत होत नाही तेव्हा हिप रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय ठरतो. अशावेळी डॉक्टर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतात आणि तुम्हाला स्वतंत्रपणे चालण्यास मदत करतात.