छातीमध्ये साचून राहिलेला कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप इत्यादी अनेक आजार वाढू लागतात. या आजारांमुळे आरोग्य आधिक बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयिंकडे लक्ष देऊन आहारात बदल करावे. हिवाळ्यात सर्दी, खोकला झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच औषध उपचार करावे. पण डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा काहीवेळा कफ फुफ्फुसांमध्ये तसाच राहतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, तर अनेकदा खोकला आल्यामुळे फुफ्फुस दुखू लागतात. छातीमध्ये कफ साचून राहिल्यामुळे छातीमध्ये सतत जडपणा जाणवतो आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कॅन्सरशी लढणाऱ्या योध्दयांसाठी आणि जागृकतेसाठी साजरा केला जातोय ‘National Cancer Awareness Day’
गोळ्या औषध घेतल्यामुळे खोकला कमी होतो, मात्र छातीमध्ये कफ तसाच साचून राहतो. छातीमध्ये कफ साचून राहिल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. छातीमध्ये आणि फुफ्फुसांमधील खोकला कमी करण्यासाठी गोळ्या औषधांसोबतच घरगुती उपाय सुद्धा करावे. घरगुती उपाय केल्यानंतर छातीमध्ये साचून राहिलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये चिटकून राहिलेला घट कफ काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत.
कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
हळद आणि दुधामध्ये असलेले गुणधर्म फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट कफ मोकळा करण्यासाठी मदत करतात. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे कफ कमी होतो. एक ग्लास गरम दुधात हळद टाकून प्यायल्यास छातीमध्ये आणि फुफ्फुसांमध्ये अडकून राहिलेला कफ कमी होण्यास मदत होईल. हळदीचे सेवन केल्यामुळे अन्ननलिका स्वच्छ होण्यास मदत होते.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म छातीमध्ये साचून राहिलेला कफ मोकळा करण्यासाठी मदत करतात. आलं आणि मध हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. मधाचे सेवन केल्यास छातीमध्ये साचून राहिलेला कफ निघून जाण्यास मदत होईल. एक चमचा आल्याचा रस घेऊन त्यात मध मिक्स करून खावे. हा उपाय सकाळी लवकर उठून करावा.
सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर सगळ्यात आधी वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्यात एक थेंब निलगिरीचे तेल घालून वाफ घ्यावी. श्वसनमार्ग स्वच्छ होतो आणि कफ विरघळण्यास मदत होते. सर्दी खोकला झाल्यानंतर वाफ घेतल्यास नाक, गळा, आणि छातीत साठलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातून दोन ते तीन वेळा वाफ घ्यावा.
हे देखील वाचा:रात्री जेवल्यानंतर अॅसिडीटी होते? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, अॅसिडीटी होईल कमी
कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
तुळशीच्या पानांचा रस बनवण्यासाठी गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यात मध मिक्स करून प्यायल्यास सर्दी, खोकला कमी कमी होईल. तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यास श्वास घेण्यास त्रास निर्माण होणार नाही. या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.