फोटो सौजन्य : गुगल
खरं तर लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांचा एक हनीमून पिरियड असतो. या हनीमून पिरियडमध्ये आपण किती पैसे उधळतो हे प्रत्येकाला कळतच असं नाही आणि नंतर मग कळायला लागतं की आपल्या खिशाला किती कात्री बसते ते कळतं. म्हणूनच लग्नानंतर बिघडणारे बजेट कसं वाचवता येईल याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
आता तुमचं जर नुकतंच लग्न झालं असेल किंवा तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर आपण सर्वाधिक पैसा कुठे वाया घालवतो आणि तो कसा टाळायला पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
एप्रिल, मे हा लगिनसराईचा सिझन असतो. जर तुमचं ही लग्न ठरलंय किंवा ठरण्यात जमा आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी. लग्न ठरल्यानंतर सगळ्यात पहिला खर्च म्हणजे शॉपिंग. कारण लग्न ठरलं म्हणजे कपडे हवेत. मग ब्रँडेड सूट पाहिजे, ब्रँडेड लेहंगा पाहिजे आणि असे बरेच कपडे खरेदी करून कपाटामध्ये भरले जातात. सहा सात महिन्या नंतर जेव्हा आपण कपाट उघडतो तेव्हा लक्षात येतं की अरे यातले अर्धे कपडे तर आपण वापरलेच नाहीयेत. त्यामुळे जेव्हा तुमचं लग्न ठरतंय तेव्हा तुम्ही त्याची नीट योजना आखून खरेदी पााहिजे त्या वस्तू खरेदी करा. आजकाल सोशल मीडिया म्हणजे जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे . कारण लग्न केल्यानंतर इंस्टाग्राम रील आणि फेसबुकवर फोटो टाकण्याची खूप घाई झालेली असते. त्यासाठी इंटरनॅशनल ट्रिप करायची असते आणि ही इंटरनॅशनल ट्रिप करण्यासाठी बरेचदा कर्ज काढलं जातं किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. पण हा असा दिखावा करणं टाळा.तुमचं बजेट काय आहे त्यानुसारच तुमच्या हनीमून ट्रिपचं प्लॅनिंग करा.
Wedding Plan : लग्न करताना बजेट कसा असावा ? काय गोष्टी लक्षात …
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर आपल्याला वेगळ्या घरात राहायला जायचं असतं. मग आपलं घर सजवायचं. या नादामध्ये अनेक अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स असू देत किंवा महागडी भांडी असू देत. तुम्हाला नवीन घरात राहायला जायचं आहे, वेगळ्या वस्तू या लागतातच पण कोणत्या वस्तू हव्यात त्याचंही एक बजेट आखणं महत्वाचं आहे. त्यानुसार खरेदी करणं फायद्याचं ठरेल.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर साधारण सहा महिने घरातले गेट टू गेेदर किंवा पार्टी काही संपत नसतात. मग अशा वेळेला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक होत नाही. त्यामुळे पार्ट्यांवर खर्च अधिक प्रमाणात होतो. आता आपलं हे लग्नानंतर बजेट बिघडण्यापासून कसं वाचायचंय ते ही माहित असणं गरजेचं आहे. यासाठी एक बजेट डायरी तयार करा. महिन्याच्या सुरुवातीलाच ठरवा की किती खर्च करायचा आणि किती बचत करायची. तुमच्या गरजा काय आहेत ते ठरवा. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा. मला याची खरोखर गरज आहे की मला फक्त ती हवी आहे. दिखाऊ वस्तूंवर पैसे घालवण्याऐवजी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा आणि आपलं भविष्य सुरक्षित करा.
लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ; स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया






