Neelam Gorhe News: मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच! विधान परिषद निवडणुकीपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी ठणकावून सांगितले
गोऱ्हे म्हणाल्या, “संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या त्यागातूनच महाराष्ट्र उभा राहिला आहे. जनतेच्या मनात आजही त्या हुतात्म्यांबद्दल आदर आणि भावना आहेत. मी त्या सर्वांना नतमस्तक आहे.” तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार
नाशिकसह राज्यातील काही भागांमध्ये महिलांच्या शोषणाच्या घटना समोर आल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. कंपन्यां आणि कारखान्यांमधील महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत त्रुटी दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई आणि परतवाडा येथील घटनांचा उल्लेख करत, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेच्या वापराबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, “प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करायला सुरुवात करावी. इतर राज्यांत गेल्यावर आपण तेथील भाषा वापरतो, मात्र मुंबईत कुठलीही भाषा चालते अशी समजूत काहींची आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, ही जाणीव जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाल्यास लोक आपोआप तिचा वापर वाढवतील. राज्य सरकार मराठीच्या वापरावर ठाम आहे आणि या काळात मराठी भाषा अनिवार्य करण्यावर भर दिला जात आहे.”
पुणे-मुंबई महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असून, सुरक्षितता वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai-Pune Missing Link: आता 90 मिनिटात पुण्यात! मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात,
महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव टिकवणे मोजक्याच नेत्यांना जमते. नीलम गोऱ्हे या देखील आपली वर्चस्व साधत 2026 मध्ये पुन्हा संधी मिळवताना दिसत आहेत. यावेळी त्या विधानपरिषदेवर जाण्याचा ऐतिहासिक ‘पंच’ पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. 2002 पासून सुरू झालेला त्यांचा विधानपरिषद प्रवास सलग 25 वर्षांपर्यंत पोहोचत असून, ही वाटचाल त्यांच्या राजकीय कौशल्याची साक्ष देणारी ठरली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता आणि सातत्यपूर्ण सक्रियता ही त्यांच्या यशामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. शिवसेना (शिंदे गट) मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी आपला प्रभाव कायम राखला आहे.






