बाळाचा जन्म झाल्यावर कधी लैंगिक संबंध ठेवता येतात (फोटो सौजन्य - iStock)
गर्भधारणेदरम्यान लोक अनेकदा शारीरिक संबंध कोणतीही जोडी टाळतेच. डॉक्टर असेही म्हणतात की, सुरुवातीच्या आणि शेवटच्या महिन्यांत ते धोकादायक असू शकते. जवळजवळ सर्वांनाच हे माहीत आहे, परंतु खरा गोंधळ असतो तो म्हणजे प्रसूतीनंतर लैंगिक संबंधांबद्दल.
याबद्दल अनेक लोकांचे वेगवेगळे युक्तिवाद आणि प्रतिवाद आहेत. काही लोक असे मानतात की बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांतच संभोग स्वीकार्य आहे, तर काही जण काही आठवडे असे करण्यापासून दूर राहणे अधिक योग्य आहे. यामागील सत्य आणि डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घेऊया. म्हणजेच डॉक्टरांच्या मते बाळ झाल्यानंतर नक्की कधी संभोग करावा आणि लैंगिक संबंध कधी ठेवणे योग्य आहे ते आपण जाणून घेऊया.
शारीरिक आणि भावनिक रिकव्हरी
जेव्हा एखादी स्त्री बाळंत होते, तेव्हा तिच्या शरीरात असंख्य हार्मोनल बदल होतात आणि ती शारीरिकदृष्ट्या कमकुवतदेखील होते. या घटकांमुळे तिच्या लैंगिक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकतात. बरेच पुरुष तक्रार करतात की त्यांच्या बायका प्रसूतीनंतर काही दिवस त्यांच्यापासून दूर राहतात, परंतु हे तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे होते. स्तनपानामुळे लैंगिक इच्छा थोडी कमी होऊ शकते. महिलांना शारीरिक आणि भावनिक पुनर्प्राप्तीची आवश्यकता असते. ती गॅप भरून काढणे अत्यंत गरजेचे असते. महिलांना यावेळी स्पर्शाची गरज असते, मात्र तो मायेचा स्पर्श असावा असे वाटते. त्यांना शारीरिक संबंध ठेवणे अजिबात नको असते. त्याला अनेक कारणे आहेत.
बाळंतपण झाल्यानंतर सीझर असेल तर टाके दुखणे, बाळाला सतत घेऊन राहणे आणि शरीरातील हार्मोन बदल ही सर्वात महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे महिलांना लगेच लैंगिक संबंध नको वाटतात.
पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवल्यावर होतात शरीरात 8 बदल, लग्नापूर्वी हे माहीत असायलाच हवे
तुम्ही कधी शारीरिक संबंध ठेऊ शकता?
हेल्थलाइनच्या अहवालानुसार आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अपर्णा पाटील यांच्या मते, प्रसूतीनंतर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, बाळंतपणानंतर शरीराला थोडी विश्रांतीची आवश्यकता असते आणि स्त्री च्या योनीलादेखील पूर्ण आकारात परत येण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच, बहुतेक डॉक्टर किमान चार ते सहा आठवडे लैंगिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. हे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही; निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
पुरुषांनी काय लक्षात ठेवावे
सामान्य आणि सी-सेक्शन प्रसूतीची वेळ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. ते स्त्री आणि तिचे डॉक्टर कधी हिरवा कंदील देतात यावर अवलंबून असते. सी-सेक्शन प्रसूतीमध्ये, टाके पूर्णपणे बरे होईपर्यंत लैंगिक संबंधासारखी क्रिया टाळली पाहिजे. पुरुषांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की शारीरिक रिकव्हरीव्यतिरिक्त, स्त्रीला बाळाची काळजी आणि झोपेचा अभाव यासारख्या गोष्टींशीदेखील संघर्ष करावा लागत आहे, अशा परिस्थितीत तिला वेळ द्या आणि परस्पर संमतीने गोष्टी हाताळा.
केवळ आपल्या मनासाठी वा शरीरसुखासाठी नाही तर आपल्या बाळाला जन्म दिलेल्या आपल्या पत्नीला पुरुषांनी समजून घ्यावे आणि तिला यातून पूर्णतः रिकव्हर होण्याची संधी द्यावी. या प्रसंगात तिची चिडचिड समजून तिला योग्य तो पाठिंबा द्यावा. यातून ती तुमच्याच पाठिंब्याने लवकर बरी होणार असते आणि त्यानंतरच तुम्ही आनंदाने एकमेकांसह पुन्हा लैंगिक संबंध ठेऊ शकता.
Low Libido In Men: पुरुषांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा होतेय कमी, काय आहेत 5 कारणं