हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी नक्की काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
ही विशेष युक्ती काय आहे? जपानी संशोधकांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक विशेष तंत्र विकसित केले आहे. त्याला ‘इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग’ असे नाव देण्यात आले आहे. इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजे काय आणि ते रक्तदाब नियंत्रित करण्यात कसे परिणाम करते ते आपण या लेखातून जाणून घेऊया.
इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग २००७ मध्ये जपानचे प्रोफेसर हिरोशी नोज आणि शिझुए मासुकी यांनी विकसित केले होते. या तंत्रात, चालणे दोन भागात विभागले गेले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंटरव्हल वॉकिंग कसे करावे? तर हे दोन विभागलेले भाग नक्की कोणते आहेत, ते आधी आपण जाणून घेऊया.
बीपी नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, इंटरवल वॉकिंग तुम्हाला इतर अनेक फायदे देऊ शकते. जसे की –






