अनेकदा घरात पाली, झुरळं फिरताना दिसत असतात. घरातील कानाकोपऱ्यात आपल्याला हे फिरताना दिसत असतात. काही लोक तर यांना इतके घाबरतात की ज्या ठिकाणी हे फिरताना दिसतात त्या ठिकाणी घाबरून जाताच नाहीत. पाली, झुरळं जरी धोकादायक नसले तरी त्यांना पाहून आपल्याला किळस येत असते. अनेकदा यांचे घरातील वाढते प्रमाण बघता आपल्याला संपूर्ण घरच किळसवाणे वाटू लागते. तुम्हालाही जर या गोष्टींपासून सुटका हवी असेल तर आम्ही सांगत असलेला हा उपाय एकदा नक्की करून पहा. आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने अगदी काहीही न करता सहज तुम्ही तुमच्या घरातून पाली, झुरळांना पळवून लावू शकता.
हेदेखील वाचा – Hair Mask: तांदळाच्या पिठात या दोन गोष्टी मिसळून केसांना लावा आणि फरक पहा, काही मिनिटांत फायदे दिसतील
लक्षात ठेवा, हे पाणी तुमच्या वॉर्डरोबमध्ये शिंपडू नका. अन्यथा तुमच्या कपड्यांना दुर्गंधी येऊ शकते. वॉर्डरोबमधून सरडे दूर करण्यासाठी नॅप्थालीन बॉल्स वापरा. या नैसर्गिक उपायाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
अंड्यांची टरफले पाली पळवण्यास मदत करू शकतात. पाली अंड्याच्या कवचापासून दूर पाळतात. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पाली जास्त दिसतात त्या ठिकाणी ही अंड्याची साले ठेवा. असे केल्याने तुम्ही पालींपासून सुटका मिळवू शकता.
पालींना पळवण्यासाठी कॉफीदेखील तुमच्या फायद्याची ठरू शकते. यासाठी ज्या ठिकाणी पाली आहेत त्या ठिकाणी कॉफीचे गोळे तयार करून त्या कोपऱ्यात ठेवून द्या. पाली पळवण्यासाठी या एक उत्तम घरगुती मार्ग आहे.