• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Amla Oil At Home Benefits For Hair Growth And Reduce Baldness

टक्कल पडतंय का? घरीच बनवा आवळ्याचं तेल, 1 महिन्यात वाढतील केस

Home Remedies For Baldness: आवळा केसांसाठी फायदेशीर आहे आणि असे म्हटले जाते की जर तुम्ही आठवड्यातून एकदाही लावायला सुरुवात केली तर पांढरे केस काळे होतील. आवळा तेल तुम्ही घरच्या घरी नैसर्गिकरित्या कसे बनवू शकता आणि त्याचा कसा उपयोग करायचा ते जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 26, 2024 | 11:07 AM
केसांची गळती होत असेल तर वापरा आवळा

केसांची गळती होत असेल तर वापरा आवळा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हल्ली प्रत्येकाला केसगळतीची समस्या आहेत. महिला असो वा पुरुष टक्कल पडण्याचं प्रमाणही वाढल्याचं दिसून येत आहेत. यासाठी अनेकदा महागड्या ट्रिटमेंट वापरल्या जातात मात्र त्याचाही काही उपयोग होत नाही असं दिसून येत आहे. मात्र आयुर्वेदातील उत्तम उपाय म्हणजे आवळा. हर्बल वनस्पती असणारा आवळा वापरून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. ज्याचा उपयोग हा परंपरागत करण्यता आला आहे. 

आवळ्याचे तेल तुम्ही घरीच बनवून त्याचा केसांवर वापर करू शकता. याचा केसांना फायदा होतो आणि तुमच्या केसांची गळतीही थांबते तसंच टक्कल पडत असेल तर वेळीच आवळ्याच्या तेलाचा उपयोग तुम्ही करून घ्यावा. आम्ही या लेखात याबाबत अधिक माहिती ब्युटिशियन स्मिता कांबळे यांच्या सल्ल्याने देत आहोत, नक्की वाचा (फोटो सौजन्य – iStock) 

आवळ्याचे तेलच का?

केसांसाठी आवळ्याचे तेलच का वापरावे

केसांसाठी आवळ्याचे तेलच का वापरावे

आम्ही तुम्हाला रेसिपीबद्दल सांगण्यापूर्वी, प्रथम आवळा तेल तुमच्या केसांसाठी इतके फायदेशीर का आहे याबद्दल माहिती घेऊ. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिड असून केसांच्या मुळांना मजबूत करण्यास, कोंडा कमी करण्यास, अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास आणि संपूर्ण टाळूच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करते. आवळा तेलाचा तुमच्या केसांच्या काळजीमध्ये समावेश केल्याने केस अधिक चमकदार, जाडसर आणि मुळापासून मजबूत होतात. 

काय साहित्य वापरावे?

आवळ्याच्या तेलासाठी साहित्य

आवळ्याच्या तेलासाठी साहित्य

आवळा तेल घरी बनवण्यासाठी, आपल्याला आवश्यक असणारे साहित्य –  

  • 10-12 ताजे किंवा वाळलेले आवळा 
  • खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल 
  • एक सॉसपॅन 
  • एक गाळणे किंवा चीजक्लोथ
  • साठवण्यासाठी स्वच्छ, कोरडी काचेची बाटली किंवा जार
कसे बनवावे आवळ्याचे तेल?

एका पातेल्यात खोबरेल किंवा तिळाचे तेल घाला. तुम्हाला आवळा तेल किती बनवायचे आहे यावर तेलाचे प्रमाण अवलंबून असते, पण सुरूवातीला 1 कप तेल घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. मंद आचेवर तेल गरम करा. ते उकळू देऊ नका, कारण जास्त आगीमुळे तेल आणि आवळ्याचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होऊ शकतात.

तेल गरम झाल्यावर चिरलेला ताजा आवळा मिक्स करा आणिॉ मंद आचेवर शिजू द्या म्हणजे त्यातील पोषक द्रव्ये जळणार नाहीत. ते शिजवण्यासाठी 30 मिनिटे लागतात हे लक्षात घ्या. 

हेदेखील वाचा – वातावरणातील बदलांचा परिणाम केसांवर दिसू लागल्यास ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी

रंगावर लक्ष द्या 

आवळ्याचे तेल बनवताना घ्यायची काळजी

आवळ्याचे तेल बनवताना घ्यायची काळजी

तेल उकळत असताना त्यावर लक्ष ठेवा. जेव्हा तुम्हाला दिसेल की तेलाचा रंग बदलू लागला आहे आणि आवळ्याचे तुकडे तपकिरी होऊ लागले आहेत तेव्हा तुम्ही गॅस बंद करा. याचा अर्थ आहे की आवळ्याचे तत्व तेलात व्यवस्थित मिक्स होत आहे. आवळा तळाशी चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा आणि नंतर गॅस बंद करा. 

थंड करून गाळा

जेव्हा तेल सोनेरी तपकिरी होईल आणि आवळ्याचे तुकडे चांगले शिजतील तेव्हा गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. आवळ्याचे तुकडे गाळण्यासाठी गाळणी किंवा चीजक्लोथ वापरा आणि स्वच्छ भांड्यात तेल गाळून घ्या. आवळ्याच्या तुकड्यांमधून शक्य तितके तेल पिळून घ्या. एका स्वच्छ जारमध्ये भरा आणि तुम्हाला जेव्हा केसांना लावता येईल तेव्हा लावा

हेदेखील वाचा – केस धुतल्यानंतर खूप गळतात? मग ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, वाढले केसांचे सौंदर्या

कसे लावावे आवळ्याचे तेल

आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे घरगुती आवळ्याचे तेल केसांना लावा आणि मालिश करा. साधारण आंघोळीच्या आधी १ तास तुम्ही केसांना लावा आणि नंतर माईल्ड शँपूने केस धुवा. तुम्हाला लवकरच केसांची गळती कमी झाल्याचे दिसून येईल. 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: How to make amla oil at home benefits for hair growth and reduce baldness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • amla for hair
  • Beauty Tips
  • hair care

संबंधित बातम्या

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन
1

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक
2

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या
3

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

Hair Growth: बुलेटच्या स्पीडने वाढेल केसांची लांबी होतील घनदाट, 3 बियांचा वापर केसांसाठी ठरेल वरदान
4

Hair Growth: बुलेटच्या स्पीडने वाढेल केसांची लांबी होतील घनदाट, 3 बियांचा वापर केसांसाठी ठरेल वरदान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; ‘या’ मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

Feb 13, 2026 | 01:43 PM
शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

शॉर्टकटचा प्लॅन फसला; ट्रॅफिकमुळे फूटपाथवर चढवली स्कूटर, पण आज्जीने केलं असं काही… चालकाला जन्माची अद्दल घडली

Feb 13, 2026 | 01:40 PM
Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Feb 13, 2026 | 01:15 PM
School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

Feb 13, 2026 | 01:11 PM
IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

Feb 13, 2026 | 01:10 PM
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Feb 13, 2026 | 01:00 PM
चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

Feb 13, 2026 | 01:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.