१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मऊ लुसलुशीत घावणे
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. घरी बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये जाळीदार घावणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. धावणे हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. घावणे तुम्ही चहा, खोबऱ्याची चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत सुद्धा खाऊ शकता. अनेकदा घावणे बनवताना जाळीदार घावणे येत नाही तर काहीवेळा घावणे तव्याला चिटकून जातात. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात घावणे बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला परफेक्ट आणि चविष्ट घावणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
चिकन कोरमा तर बऱ्याचदा खाल्ला असेल पण कधी फणसाचा कोरमा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी






