शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा Apple Shake
संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. कामावरून घरी थकून आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी नाश्त्यात वडापाव, सामोसा किंवा शेवपुरी आणून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अतितेलकट पदार्थांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेहाचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये अॅपल शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नियमित एक सफरचंद खाण्याचा डॉक्टरसुद्धा सल्ला देतात. अॅपल शेकचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आवश्यक पोषक घटक मिळतात. या शेकचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया अॅपल शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
साधा, सोपा, झटपट नाश्ता! घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार