लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा फ्लॉवर बटाट्याची चविष्ट भाजी
लहान मुलांना डब्यात नेमकं काय खाण्यास द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी अनेकदा मुलांना बाहेरून विकत आणलेले स्नॅक्स किंवा इतर पदार्थ खाण्यास दिले जातात. पण नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ मुलांना द्यावे. शाळेच्या डब्यात अनेकदा मुलं वेफर्स, चिप्स किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यास घेऊन जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करण्यास दिल्यानंतर मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. त्यामुळे लहान मुलांना डब्यात चपाती भाजी किंवा सँडविच इत्यादी पदार्थ द्यावे. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी ढाबा स्टाईल फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या भाजीचे सेवन मुलं आवडीने करतील आणि आरोग्याला फायदेसुद्धा होतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा