१० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा गरमागरम देसी बर्गर
हल्ली सर्वच लहान मुलांना पिझ्झा, बर्गर, सँडविच इत्यादी अनेक चमचमीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. याशिवाय नाश्त्यात मुलांना नेहमीच काहींना काही नवीन पदार्थ हवा असतो. शाळेच्या डब्यात चपाती भाजी किंवा पुरी भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं डब्बा खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांच्या डब्यासाठी नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट गरमागरम देसी बर्गर बनवू शकता. वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला देसी बर्गर मुलांना खूप जास्त आवडेल. देसी बर्गर तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ बनवायला महिलांना नेहमीच आवडत. बाजारात विकत मिळणारा बर्गर खाण्याऐवजी घरी बनवलेला हेल्दी बर्गर डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया देसी बर्गर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर