साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी
थंडीच्या दिवसांमध्ये कायमच उष्ण पदार्थांचे सेवन करावे. कारण या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यवर लगेच दिसून येतो. आरोग्यासाठी प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे लसूण. वर्षाच्या बाराही महिने बाजारात लसूण उपलब्ध असते. लसूण खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी डाळ आणि भाजीमध्ये लसूण टाकला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटकदार लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही लसूण चटणी खाऊ शकता. या पद्धतीने बनवलेली लसूण चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. लसूणमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा लसूण खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. लसणीच्या पाकळ्यांमध्ये ॲलिसिन नावाचे गुणधर्म असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
मराठवाडा स्पेशल रेसिपी! डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट कुरडई भाजी, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव






