तोंडी लावण्यासाठी बनवा हिरव्यागार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा
थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या जेवणात सगळ्यांचं झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकदा घरी असलेला ओल्या मिरचीचा ठेचा खाल्ला जातो. मात्र नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत आणि तिखट खाण्याची इच्छा होते. तेव्हा तुम्ही घरी ओल्या लसणीच्या पतीचा ठेचा बनवू शकता. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये सर्व हिरव्या भाज्या उपलब्ध असतात.त्यामुळे या दिवसांमध्ये लसूणची पात सहज उपलब्ध होते. लसूणच्या पातीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लसूणच्या ओल्या पातीपासून झणझणीत ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. संध्याकाळच्या जेवणात जर ओल्या लसूणच्या पातीचा ठेचा असेल तर जेवणात दोन घास जास्त जातील आणि जेवण जेवल्यासारखे वाटेल. चला तर जाणून घेऊया ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा