आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट
आषाढ महिन्याला सुरुवात झाल्यानंतर महिनाभर घरात वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. राज्याच्या वेगवेगळ्या भागात बनवले जाणारे चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर कापण्या चहासोबत किंवा भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. गव्हाच्या पिठाचा वापर करून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. संध्याकाळच्या नाश्त्यात नेहमीच बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या चविष्ट कापण्या खाव्यात. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. पोषक चवीचा पारंपरिक पदार्थ आवडीने खाल्ला जातो. कापण्या बनवताना साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाचा वापर करावा. यामुळे चव अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






