पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट घरी बनवा मुगाचे पौष्टिक कढण
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूप प्यायला खूप जास्त आवडते. चिकन सूप, कडधान्यांचे सूप किंवा भाज्यांचा वापर करून सूप बनवले जाते. सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.कारण बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. अजूनही अनेक घरांमध्ये पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मुगाचे कढण. मूग खाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. मुगाचे काढणं तुम्ही वर्षाच्या बाराही महिने सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही मुगाचे कढण बनवून पिऊ शकता. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल आणि शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारेल. चला तर जाणून घेऊया मुगाचे काढणं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळी होईल स्पेशल! घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे साबुदाणा पॅटीस, नोट करा रेसिपी