वाटीभर शेवग्याच्या पानांपासून बनवा चविष्ट चटणी
शेवग्याच्या शेंगांसह पानांमध्ये सुद्धा भरपूर पोषण आढळून येते. दैनंदिन आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यास शरीराला कॅल्शियम, प्रोटीन मिळण्यास मदत होईल. शेवग्याच्या पानांमध्ये आणि शेंगांमध्ये प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शेवग्याच्या शेंगांपासून भाजी, तिखट डाळ, भजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय शेवग्याच्या पानांची भाजी अनेक लोक आवडीने खातात.पोषक घटकांनी भाजीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. शेवग्याच्या पानांची पावडर तयार करून कोमट पाण्यात टाकून सेवन केले जाते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी शेंगव्याची पाने अतिशय प्रभावी आहेत. आज आम्ही तुम्हाला शेंवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ‘खारे शेंगदाणे’, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरतील पौष्टिक






