१० मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीत बनवा आंबा खोबऱ्याची वडी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात हापूस आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हापूस आंब्यांचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय या आंब्यापासून अनेक वेगवेगेळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. आमरस, आंब्याचा केक, पन्ह, चटणी, सांदण, पोळी, लाडू याशिवाय अनेक पदार्थ बनवले जातात. कोकणात वर्षाच्या बाराही महिने नारळ उपलब्ध असतात. नारळाच्या आतील खोबऱ्याचा वापर भाजी बनवताना किंवा इतर गोड पदार्थ बनवताना केला जातो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये तयार होणारी आंबा नारळाच्या वड्यांची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. याशिवाय आंब्यापासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. गोड पदार्थ सगळ्यांचं घरांमध्ये आवडीने खाल्ले जातात. चला तर जाणून घेऊया आंबा खोबऱ्याची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कांदा लसुणचा वापर न करता भंडारा स्टाईलने बनवा काळ्या चण्यांची चविष्ट भाजी, लहान मुलं खातील आवडीने