भाजणी तयार करा वेळ नाही! मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ, नोट करा इन्स्टंट रेसिपी
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं सुचत नाही. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. सुट्टीच्या दिवशी नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांना नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. पण सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही झटपट कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ आणि त्यासोबत दही किंवा हिरव्या मिरचीचं लोणचं अतिशय आवडीने खाल्ले जाते. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. थालीपीठ बनवायचं म्हंटल की भाजणी विकत आणावी लागते. पण नेहमीच विकतची भाजणी आणून थालीपीठ बनवण्यासाठी घरातील साहित्याचा वापर करून थालीपीठ बनवावे. अस्सल गावरान चवीचे थालीपीठ खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया कांद्याचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी






