सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पालक सूप
हिवाळ्यात बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पालक, मेथी, मुळा, लाल माठ इत्यादी भाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, जीवनसत्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मात्र लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाही. हिरव्या पालेभाज्यांचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. पालेभाज्या लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा आवडत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पालकचा वापर करून चविष्ट आणि हेल्दी पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक सूप लहान मुलांना नक्की आवडेल. याशिवाय पालक सूप बनवताना तुम्ही त्यात इतर वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा समावेश करू शकता. चला तर जाणून घेऊया पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी चिया सीड्स पुडिंग, वजन राहील नियंत्रणात