सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी चिया सीड्स पुडिंग
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण चुकीच्या आणि शरीराला पचन न होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्यासोबतच वजन सुद्धा वाढत जाते. त्यामुळे आहारात योग्य आणि पोषक पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. पण सकाळच्या वेळी उपाशी पोटी राहिल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. उपाशी पोटी राहिल्यामुळे आजारांची लागण लगेच होते. त्यामुळे सकाळच्या वेळी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिया सीड्स पुडिंग बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही कोणत्याही वेळी बनवून खाऊ शकता. चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया चिया सीड्स पुडिंग बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पास्ता लव्हर्ससाठी खास! आता बनवून पहा रेस्टॉरंट स्टाईल पिंक सॉस पास्ता, झटपट रेसिपी