श्रावणातील नैवेद्यासाठी घरीच बनवा पारंपरिक पद्धतीने पंचामृत
सण उत्सवांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये वातावरणात थंडावा असतो, ज्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरते. तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. याच महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा,गणेशोत्सव इत्यादी सर्वच असतात. श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा करून इच्छित फळ प्राप्तीसाठी उपवास केला जातो. या महिन्यात पूजापाठ, व्रत, पूजाअर्चा असल्यामुळे सगळीकडे प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पंचामृत. प्रसादामध्ये गोडाचा शिरा आणि पंचामृत दिले जाते. पूजेच्या वेळी तयार केलेले पंचामृत देवाला दाखवून मगच घरातील प्रत्येक व्यक्तीला दिले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पंचामृत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पंचामृत चवीला अतिशय सुंदर लागते.(फोटो सौजन्य – istock)
मक्याच्या दाण्यांचा वापर करून नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘कॉर्न-रवा बॉल्स’, नोट करून घ्या रेसिपी