संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी घरी बनवा पनीर गोल्डन फ्राय
संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. दिवसभर काम आणि प्रवाह करून थकून आल्यानंतर भूक लागते. भूक लागल्यानंतर नाश्त्यात नेमकं काय खावं, हे सुचत नाही. कायमच विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. कधी पाणीपुरी, शेवपुरी तर कधी चायनीज आणि इतर तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच विकतचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. सतत तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला छोटी मोठी भूक भागवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पनीर गोल्डन फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेत जर काही बनवण्याचे असेल तर तुम्ही पनीर गोल्डन फ्राय बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर गोल्डन फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात, नोट करून घ्या पदार्थ