कांदा लसूणचा वापर न करता बाप्पाच्या नैवैद्यासाठी झटपट बनवा पनीर मसाला
गणपती बाप्पाचे आगमन झाल्यामुळे सगळीकडे एक वेगळेच आनंद आणि उत्साह निर्माण झाले आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो कांदा लसूण शिवाय जेवणाला चव कशी लागेल? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कांदा लसूणचा वापर न करता पनीर मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीरची भाजी घरात बऱ्याचदा बनवली जाते. नैवैद्यात कायमच गोड पदार्थ दाखवले जातात. यासोबतच संपूर्ण जेवणाचे ताट सुद्धा तयार केले जाते. चला तर जाणून घेऊया कांदा लसूणचा वापर न करता पनीर मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जिभेवर ठेवताच विरघळेल पदार्थ