Perfect Option For Party Snacks Make Tasty Baby Corn Chili At Recipe Will Be Ready In 10 Minutes
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी
Baby Corn Chili Recipe : चायनीज लव्हर्ससाठी खास, काही नवीन ट्राय करायचं असेल तर घरी बनवून पहा चविष्ट अशी बेबी कॉर्न चिली. याची रेसिपी फार सोपी आहे आणि कमी वेळेत ती तयारही होते.
भारतीय आणि चायनीज खाद्यसंस्कृतीचं सुंदर मिश्रण म्हणजे बेबी कॉर्न चिली. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर बेबी कॉर्न जेव्हा चटकदार सॉस आणि भाज्यांच्या चवीसोबत मिसळतात, तेव्हा हा पदार्थ कोणाच्याही जिभेवर रुजतो. पार्टी, पाहुणचार किंवा संध्याकाळचा हलका स्नॅक कोणत्याही प्रसंगी हा पदार्थ मन मोहून टाकतो. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जशी बेबी कॉर्न चिली मिळते, तशीच चव घरीही अगदी सहज तयार करता येते. त्यात खर्च कमी, वेळ कमी आणि चव मात्र अप्रतिम! चला तर मग पाहूया ही स्वादिष्ट बेबी कॉर्न चिली रेसिपी.
यासाठी सर्वप्रथम बेबी कॉर्न स्वच्छ धुवून घ्या. नंतर पाण्यात थोडं मीठ टाकून ५ ते ७ मिनिटे उकळून घ्या, म्हणजे ते अर्धवट शिजतील.
एका वाडग्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि मिरी पूड घालून थोडं पाणी टाकून घट्ट मिश्रण तयार करा. त्यात उकडलेले बेबी कॉर्न टाका आणि नीट मिक्स करा.
एका कढईत तेल गरम करा आणि या बेबी कॉर्नचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर बाजूला ठेवा.
दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा. आले-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतवा. नंतर चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची घालून थोडं परता, पण त्यांचा कुरकुरीतपणा टिकू द्या.
आता त्यात टोमॅटो सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घाला. सर्व सॉस चांगले मिक्स करा.
तळलेले बेबी कॉर्न यात घाला आणि सर्वकाही छानपणे मिसळा.
गरज वाटल्यास थोडं पाणी टाका, जेणेकरून मसाला सर्वत्र नीट लागेल.
वरून काळी मिरी पूड आणि स्प्रिंग ऑनियन टाकून सजवा. गरमागरम सर्व्ह करा.
ही बेबी कॉर्न फ्राईड राईस आणि नूडल्ससोबत सर्व्ह केल्यास अधिक चविष्ट लागते.
Web Title: Perfect option for party snacks make tasty baby corn chili at recipe will be ready in 10 minutes