चैत्र गौरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ह
गुढी पाडव्यानंतर चैत्र महिन्याला सुरुवात होते. या महिन्यात अनेक घरांमध्ये गौरी पूजन केले जाते. गौरीची स्थापना करून अनेक वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात होते. चैत्रमासात असलेल्या गौराईचा थाटाचं वेगळा असतो. गौराईच्या गळ्यात सुंदर सुंदर दागिने घालून छान तयारी केली जाते. याशिवाय देवीला वेगवेगळ्या फळांची आरास केली जाते. चैत्र गौराईचे आगमन झाल्यानंतर अनेक घरांमध्ये हळदी कुंकू ठेवले जाते. महिनाभर विविध नियमांचे पालन करत चैत्र गौराईची पूजा केली जाते. चैत्रामध्ये आंब्याला मोहर येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये गौराईला वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे चैत्र गौरौईच्या हळदीकुंकूमध्ये महिलांना देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला थंडगार पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कच्च्या कैरीचे पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावरील चरबी होईल झपाट्याने कमी