लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत 'शेजवान रोल
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. बाहेर थंडगार वातावरण झाल्यानंतर अनेक घरांमध्ये लहान मुलांसह मोठ्यांसाठी भजी बनवली जाते. मात्र नेहमीच कांदा भजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना तिखट आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही कुरकुरीत शेजवान रोल बनवू शकता. चायनीजमधील शेजवान चटणी लहान मुलं अतिशय आवडीने खातात. मुलांना नेहमीच नाश्त्यात बाहेरील पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावे. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे उलट्या, जुलाब किंवा इतर साथीच्या आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे नेहमीच घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया शेजवान रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी