झटपट बनवा चिंच गुळाची आंबट तिखट आमटी
रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा डाळ किंवा तिखट आमटी बनवली जाते. मुगाची आणि तूरडाळची वापरून बनवलेली डाळ चवीला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते. मात्र नेहमीच साधे वरण खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट चिंच गुळाची आंबट गोड आमटी बनवू शकता. आंबट तिखट आमटी जेवणात असेल तर चार घास जेवण जास्त जात. आंबट तिखट आमटी तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता. घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं तुम्ही बनवलेली चिंच गुळाची आमटी खूप जास्त आवडेल. गूळ आणि चिंच आरोग्यासाठी गुणकारी असतात. गूळ खाल्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो, तर चिंच खाल्यामुळे पचनाची समस्या उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया चिंच गुळाची आंबट तिखट आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पारंपरिक पद्धतीमध्ये झटपट बनवा झणझणीत कांदा लसूण मसाला, जेवणाला येईल चटकदार चव
शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल