सर्पदंशाबद्दल जागरूकता, उपचार व व्यवस्थापन ही काळाची गरज
मुंबई: देशातील वेगवेगळ्या भागांत मन्सूनचे आगमन होऊ लागल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये सर्पदंशाच्या घटना वाढू लागतात. त्यापूर्वी, उच्च दर्जाच्या सर्पविषरोधक औषधांच्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून आघाडीवर असलेल्या भारत सीरम्स अँडवॅक्सिन्स लिमिटेड (बीएसव्ही) या मॅनकाइंड ग्रुपच्या कंपनीने सुयोग्य उपचार सर्वांच्या आवाक्यात येतील, उपलब्ध होतील याची निश्चिती करणाऱ्या ठोस उपक्रमांची आखणी केली आहे. त्याचप्रमाणे सर्पदंश व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या आणि त्यासंदर्भातील गैरसमज दूर करणाऱ्या उपक्रमांचे नियोजनही केले आहे.(फोटो सौजन्य – iStock)
कंपनीच्या इंडिया बिझनेस विभागाच्या सीओओ सिवानी सरमा डेका म्हणाल्या, “सर्पविषरोधक औषधांच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून बीएसव्ही सर्पदंशावर दर्जेदार व प्रभावी उपचार विकसित करण्यात आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यात कायमच अग्रेसर राहिली आहे. अवेअरनेस,अॅक्सेस, अव्हेलॅबिलिटी आणि अॅक्शन या ४‘ए’वर काम करणे ही आमची जबाबदारी आहे, असे आम्हाला वाटते. योग्य रुग्णाला, योग्य ठिकाणी, योग्य वेळी योग्य उपचार मिळावे ही आमची जबाबदारी आहे. यासाठी आम्ही सातत्याने बहुविभागीय सहयोग उभे करत आहोत आणि प्रतिबंध, प्रथमोपचार, सर्पदंश झालेल्या रुग्णांना नजीकच्या आरोग्यकेंद्रांत लवकरात लवकर व योग्य पद्धतीने पोहोचवणे यांसाठी लक्ष्यीकृत हस्तक्षेप करत आहोत. जेणेकरून, सर्पदंशाशी व त्यावरील उपचारांशी निगडित पुरातन गैरसमज दूर केले जाऊ शकतील. याशिवाय आम्ही आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांसाठी वैज्ञानिक कार्यक्रम राबवून वैद्यकीय शिक्षण देण्यावरही सक्रियपणे लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमांमध्ये माहितीचे व स्नेकबाइट एन्वेनोमेशन (एसबीई) व्यवस्थापनाच्या पद्धतींचे सातत्यपूर्ण अद्ययावतीकरण सरकारच्या स्टॅण्डर्ड ट्रीटमेंट गाइडलाइन्सच्या (एसटीजी) अंमलबजावणीमार्फत केले जाते.”
जागरूकता यावर बोलताना, डॉ. सदानंद राऊत, शिवनेरी भूषण, आरोग्य रत्न महाराष्ट्र सरकार 2023 एमडी (जनरल मेड.) सल्लागार फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट, टॉक्सिकोलॉजिस्ट म्हणाले,“सर्पदंशाचा समावेश ‘सूचित करण्याजोग्या आजारां’मध्ये करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीमुळे डेटा संकलन, संसाधन वितरण, प्रतिबंध आणि लवकर उपचार यांबाबतची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. याची परिणती आजाराचे प्रचलन निश्चित करणे, आजार लवकर ओळखणे आणि त्यातून होणारे मृत्यू किंवा विकलांगता टाळण्यासाठी हस्तक्षेप यांमध्ये होऊ शकेल. शिवाय, संशयित किंवा संभाव्य प्रकरणांची व सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद करण्यातही याची मदत होणार आहे. त्यामुळे देखरेख आणि डेटा संकलन सुधारेल आणि अखेरीस सर्पदंशामुळे होणारे मृत्यू व विकलांगता कमी करणे शक्य होईल. सर्पविषरोधक औषधे व वैद्यकीय उपचार यांतील तफावती भरून काढण्यावर त्यामुळे भर देणे शक्य होईल आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रतिबंधाच्या प्रयत्नांमध्ये स्थानिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन समुदायाचे योगदान वाढवता येईल.”
डॉ. सदानंद राऊत, शिवनेरी भूषण, आरोग्य रत्न महाराष्ट्र सरकार 2023 एमडी (जनरल मेड.) कन्सल्टंट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट, टॉक्सिकोलॉजिस्ट यांनी अधोरेखित केले की, “भारतात दरवर्षी 58000 हून अधिक जणांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यूचे व विकलांगता येण्याचे प्रचलन आहे. सर्पदंशावरील उपचारांची निष्पत्ती सुधारण्यासाठी सर्पदंश ओळखण्यापासून ते लवकरात लवकर उपचार उपलब्ध करून देण्यापर्यंत बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. विषबाधेमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागूंतींच्या व्यवस्थापनासाठी व रुग्णातील निष्पत्ती सुधारण्यासाठी हे निर्णायकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. सर्पदंशाबद्दलची समज वाढवून, जागरूकता निर्माण करून, समुदायांना शिक्षित करून तसेच देशभरात उपचार अधिक व्यापक स्तरावर आवाक्यात येतील व उपलब्ध होतील याची निश्चिती करून आपण सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचवू शकतो.
‘या’ लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट, ट्रीटमेंटनंतर होऊ शकतो मृत्यू, वेळच व्हा सावध
सर्पदंश हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढील गंभीर स्वरूपाचे आव्हान आहे. सर्पदंशामुळे निर्माण होणारी सामाजिक-आर्थिक आव्हाने, सर्पविषरोधक औषधांची व वैद्यकीय उपचारांच्या उपलब्धतेतील कच्चे दुवे आदी समस्यांवर मात करण्यासाठी सर्वांगीण धोरण विकसित करण्याची गरज आहे. सर्पदंशाबद्दल जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधाच्या प्रयत्नांमध्ये स्थानिक सहभागाला प्रोत्साहन देऊन समुदायाच्या योगदानाचा स्तर वाढवणे हे त्याहून महत्त्वाचे आहे.