बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय:
बिघडलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल, जंक फूड, अपचन इत्यादी अनेक गंभीर समस्यांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे बद्धकोष्ठता किंवा पोटासंबंधित इतर आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. सतत तिखट, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे आतड्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. या विषारी पदार्थांमुळे शरीर डिटॉक्स न होता आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते. ज्यामुळे पचनक्रिया बिघडणे, वारंवार पोटात दुखणे, आंबट ढेकर, पित्त होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. आपल्यातील अनेक लोक गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त इत्यादी समस्यांनी त्रस्त आहात. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा गुलकंद खावे.(फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा आपल्याला बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या अतिशय सामान्य वाटते. पण योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे आतड्यांच्या चिंध्या होऊन इतर गंभीर आजार होतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घ्यावी. बाजारात मिळणाऱ्या गोळ्या औषधांचे सेवन करून बद्धकोष्ठतेवर आराम मिळवता येत नाही. गोळ्या औषध तेवढ्या पुरती शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी दैनंदिन आहारात नियमित गुलकंदाचे सेवन करावे. गुलकंद खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवलेले गुलकंद संपूर्ण शरीरासाठी पौष्टिक आहे. गुलाबाचा फुलांचा वापर धार्मिक पूजेसाठी केला जातो. पोट, मेंदू आणि आम्लपित्तामच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी गुलकंद खावे. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलकंद खावे.
गुलकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम, गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर खलबत्यामध्ये खडीसाखर घेऊन गुलाबाच्या पाकळ्या बारीक कुटून घ्या. त्यानंतर त्यात मध आणि काळीमिरी घेऊन मिक्स करा. तयार करून घेतलेलं मिश्रण काचेच्या बरणीमध्ये भरून उन्हात एक किंवा दोन दिवस ठेवा. त्यानंतर त्यात वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुलाबाच्या पाकळ्यांचे गुलकंद.
उन्हाळ्यात निरोगी आरोग्यासाठी ‘या’ फळांचे न चुकता करा सेवन! शरीर राहील कायम हायड्रेट आणि निरोगी
बाबा रामदेव यांनी सांगितल्यानुसार तुम्ही गुलकंद नुसतेच सुद्धा खाऊ शकता. याशिवाय एक चमचा पाण्यात गुलकंद मिक्स करून खाल्यास सुद्धा शरीराला फायदे होतील. काहींना दुधातून गुलकंद खाण्याची सवय असते. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी नियमित गुलकंद खावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.