महागडी मल्टिव्हिटामिन पावडर विकत आणण्यापेक्षा १०० रुपयांमध्ये घरीच बनवा हेल्दी multivitamin powder
हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अशक्तपणा, थकवा आणि आरोग्यासंबंधित इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात निर्माण झालेल्या पोषणाच्या अभावामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, झोपेची कमतरता, सतत जंक फूडचे सेवन, दारू सिगारेट इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थकवा कमी करण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेले महागडी मल्टीविटामिन औषधे, प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्स इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण या गोळ्या औषधांमध्ये केमिकल्स, प्रेझर्व्हेटिव्ह्ज मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वजन वाढवण्यासाठी खाल्लेल्या सप्लिमेंट्स आणि पावडरचा परिणाम कालांतराने शरीरावर दिसून येतो. डोकेदुखी, ऍसिडिटी, त्वचेच्या समस्या इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महागड्या मल्टिव्हिटामिन पावडर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही पावडर महिनाभर व्यवस्थित टिकून राहते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
Recipe : चिकन-मटणालाही मागे टाकेल ही गावराण रसरशीत भाजी; थंडीच्या दिवसांत गरमा गरम बनवून खा






