स्नायूंमध्ये नेमकी कशामुळे फडफड होते?
शरीरामध्ये विटामिन किंवा इतर कोणत्याही पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे किंवा पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यामुळे अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र हेच बदल पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. अचानक कधीतरी डोळा फडफडणे, हात, पाय, खांदा थरथरू लागणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. याशिवाय काहीजणांचे शरीर अचानकपणे थरथरू लागते. अशावेळी नेमकं काय करावं हे कोणालाच सुचत नाही. स्नायूंमध्ये वाढलेल्या हालचाली शरीराच्या कोणत्याही भागात होऊ लागतात. अनेकदा सगळ्यात जास्त पापण्या, दंड, पाय, बोटं आणि तळपायांमध्ये फडफड जाणवू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात कोणत्याही वेदना न होता स्नायूंमध्ये होणारी फडफड आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्नायूंमध्ये नेमकी कशामुळे फडफड होते? डोळे कशामुळे फडफडतात? इत्यादी अनेक गोष्टींची सविस्तर माहिती सांगणार आहोत. मात्र पुन्हा पुन्हा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अनेक लोक मानसिक तणावात जातात. सतत शरीर फडफडणे हे नर्वस सिस्टीमशी संबंधित समस्या आहे. चला तर जाणून घेऊया कशामुळे उद्भवू शकते ही समस्या आणि त्यावरील उपाय.
दैनंदिन आहारात अनेकांना सतत चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात कॅफीनचे प्रमाण वाढू लागते. जास्त चहा, कॉफी, निकोटीनचे अतिसेवन केल्यामुळे नर्वस सिस्टीम अधिक उत्तेजित होते, ज्यामुळे स्नायूंमध्ये फडफड वाढते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी कॅफीनचे सेवन करावे.
शरीरात मानसिक तणाव आणि चिंता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तणाव चिंता वाढल्यामुळे नर्वस सिस्टीम जास्त सक्रिय होते आणि शरीरातील स्नायू फडफडू लागतात. यामध्ये प्रामुख्याने पापण्या आणि चेहऱ्यावर ही समस्या अधिक जाणवते. त्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगासने करावीत.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीर डिहायड्रेट होऊन जाते. याशिवाय पोटॅशिअम, कॅल्शिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम इत्यादी सर्वच घटक शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता आणि विटामिनचा अभाव निर्माण झाल्यानंतर स्नायूंमध्ये तणाव वाढू लागतो आणि डोळा फडफडणे किंवा हात पाय फडफडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया बिघडण्यासोबतच आरोग्यसुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. पुरेशी झोप न झाल्यामुळे नर्वस सिस्टीमचे संतुलन बिघडते. ज्यामुळे स्नायूंमध्ये झटके लागल्या सारखे वाटणे किंवा डोळा फडफडणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. जास्त एक्सरसाईज केल्यानंतर सुद्धा ही समस्या उद्भवू शकते.
स्नायूंमध्ये वाढलेले फडफड कमी करण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करणे. यासोबतच शरीर सक्रिय असणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नियमित कमीत कमी अर्धा तास चालायला जाणे. कॅफीन, चहा, एनर्जी ड्रिंक्स आणि निकोटीन इत्यादी हानिकारक पदार्थांचे सेवन करणे टाळावे.