त्वचा सुंदर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी पपईचा पानांचा 'या' पद्धतीने करा वापर
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बाजारात उपलब्ध असलेले अनेक वेगवेगळे केमिकलयुक्त प्रॉडक्ट, फेसपॅक, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. मात्र सुंदर त्वचेसाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यासाठी पपईचा वापर करावा. पपई आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि फायबरमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. पपईमध्ये असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन त्वचा उजळदार करण्यासाठी मदत होते.(फोटो सौजन्य – pinterest)
पपईसोबत पपईची पाने सुद्धा आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. चेहऱ्यावर आलेले डाग, डेड स्किन, काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर करावा. पपईच्या सालींपासून,पानांपर्यंत, बियांपासून सगळ्याचं गोष्टींसाठी केला जातो. यासाठी सुंदर त्वचेसाठी पपईच्या गराचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पपईच्या पानांचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पपईची पाने आरोग्यासह त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
पपईच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपईची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपईची पाने घालून त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये मध आणि बेसन घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावून २० ते २५ मिनिटं ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्याभर नियमित लावल्यास त्वचा अतिशय उजळदार होईल. पपईच्या पानांचा फेसपॅक त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करतात.