Ex सोबतची मैत्री पुन्हा देईल का दगा? 'मैत्रीचा हात' पुढे करण्यापूर्वी 'या' ४ गोष्टींचा नक्की विचार करा (Photo Credit- Ai)
अलीकडेच शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेता वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट यांनी या विषयावर भाष्य केलं. त्यांच्या मते, जर दोन्ही व्यक्ती समजूतदार असतील आणि नात्याची सुरुवात मैत्रीने झाली असेल, तर ब्रेकअपनंतर मित्र राहणे शक्य आहे. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे.
मैत्री करण्यापूर्वी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या ‘एक्स’पासून भावनिकदृष्ट्या पूर्णपणे दूर झाला आहात का? जर त्यांच्या आयुष्यातील नवीन अपडेट्स पाहून तुम्हाला अजूनही त्रास होत असेल किंवा त्यांच्याशी बोलल्याने जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊन तुम्हाला रडू येत असेल, तर मैत्रीचा विचार सध्या टाळलेलाच बरा.
मैत्री करण्यामागे तुमचा नेमका हेतू काय आहे? अनेकदा लोक बदला घेण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यासाठी किंवा पुन्हा प्रेमात पडण्याच्या आशेने मैत्री करतात. जर तुमच्या मनात अशा काही अपेक्षा असतील, तर ही मैत्री तुम्हाला पुन्हा एकदा एकाकीपणाच्या खाईत लोटू शकते.
Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या
तुमच्या ‘एक्स’सोबतच्या मैत्रीचा परिणाम तुमच्या सध्याच्या किंवा भविष्यातील जोडीदारावर होऊ शकतो. जुन्या प्रेमाशी असलेली जवळीक तुमच्या नवीन नात्यात गैरसमज आणि संशय निर्माण करू शकते. त्यामुळे, ही मैत्री तुमच्या भविष्यातील सुखाच्या आड येणार नाही ना, याचा विचार नक्की करा.
जर तुम्ही मित्र राहण्याचा निर्णय घेतलाच असेल, तर काही ‘बाउंड्रीज’ किंवा मर्यादा आखून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक गोष्टी शेअर करणे, सतत मेसेज किंवा कॉल करणे यावर नियंत्रण हवे. मर्यादेशिवाय असलेली ही मैत्री पुन्हा एकदा ‘भावनिक परावलंबित्वात’ बदलू शकते, जी तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक ठरेल.
ब्रेकअपनंतर मित्र राहणे ही एक वैयक्तिक निवड आहे. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये कमालीची मॅच्युरिटी असेल, तरच हे शक्य आहे. अन्यथा, जुन्या जखमा पुन्हा अन् सॅड गाणी एकण्यापेक्षा आपल्या आयुष्यात पुढे जाणे हाच उत्तम पर्याय ठरतो.
शरीर संबंधाबाबतचा सर्वात महत्वाचा प्रश्न! तुम्ही तुमची Virginity कोणत्या वयात गमावली पाहिजे?






