केमिकलयुक्त साबणाला द्या कायमची सुट्टी! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हळदीचा साबण
शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते. सकाळी उठल्यानंतर सगळेच अंघोळ करतात. अंघोळ करताना काहींना साबण, फेसवॉश किंवा बॉडीवॉश बनवण्याची सवय असते. मात्र बाजारात मिळणाऱ्या साबणामध्ये किंवा फेसवॉशमध्ये त्वचेस हानिकारक ठरणारे अनेक घटक आढळून येतात. या घटकांच्या वारंवार वापरामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. बदलत्या ऋतूंनुसार स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यात त्वचा अतिशय काळवंडलेली वाटू लागते तर पावसाळ्यात वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचेचे नुकसान होऊन चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले मुरूम लवकर बरे होत नाही. त्याचे डाग दीर्घकाळ चेहऱ्यावर तसेच टिकून राहतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना कोणत्याही हानिकारक स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – pinterest)
त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी कोणत्याही हानीकारक साबणाचा किंवा फेसवॉशचा वापर करण्याऐवजी हळदीचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. हळद त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला हळदीचा साबण तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने साबण बनवल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.
हळदीचा साबण बनवताना सर्वप्रथम, ओली हळद स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हळदीची साल काढून बारीक तुकडे करा. त्यानंतर हळदी बारीक वाटून कॉटनच्या कपड्यावर तयार केलेली पेस्ट ओतून रस काढून घ्या. नारळाच्या तेलात किंवा ग्लिसरीन बेस सोपमध्ये बर्फ घालून मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर जाडसर पेस्ट तयार होईल. तयार केलेल्या मिश्रणात हळदीचा रा घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर साबणाच्या मोल्टमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. तयार होईल सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हळदीचा साबण.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे त्वचेचे हानिकारक किरणांपासून रक्षण होते. त्वचेवर वाढलेले मुरुम किंवा पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी हळदीचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेच्या ओपन पोर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. डोळ्यांखाली आलेली काळे वर्तुळ घालवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर न करता हळदीच्या साबणाचा वापर करावा.