कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा बदाम शेक
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळेच लोक आवडीने थंड पदार्थांचे सेवन करतात. दही, ताक, आईस्क्रीम किंवा इतर थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन जाते.शरीरात वाढलेली उष्णता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. कारण यामुळे अपचन, उलट्या किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्यात सर्वच घरांमध्ये नेहमी नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्यायले जाते. मात्र नेहमीच हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही काहींना काही नवीन पदार्थ बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम खाणे आरोग्यासाठीबा अतिशय पौष्टिक आहे. बदाम खाल्यामुळेबी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि ऊर्जा निर्माण होते. उन्हाळ्यात सतत घाम आल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते. अशावेळी बदाम शेकचे सेवन केल्यास शरीर निरोगी राहील.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल