जेवणात झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा भाजलेल्या लसणाची चटणी
जेवायला बसल्यानंतर लहान मुलांसह मोठे सुद्धा भाज्या खाण्याचा नकार देतात. तर काहींना कोणत्याही भाज्या किंवा कडधान्य खायला आवडत नाही. भाज्यांचे नाव ऐकल्यानंतर तोंड मुरडतात. पण असे न करता रोजच्या आहारात पालेभाज्या किंवा इतर हंगामी भाज्यांचे सेवन करावे. भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण आज आम्ही तुम्हाला जेवणात ६तोंडी लावण्यासाठी भाजलेल्या लसूणची सोप्या पद्धतीमध्ये चटणी बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये बनवलेली लसूण चटणी एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. पालेभाज्या आणि भाज्यांसोबतच आहारात लसूण खाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कारण लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. भाकरी किंवा चपातीसोबत लसूण चटणी अतिशय सुंदर लागते. याशिवाय तुम्ही भातामध्ये मिक्स करून सुद्धा लसूण खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ
Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर ‘पुरणाचे दिंड’






