Recipe : विविध भाज्या, मसाले आणि तांदूळ यांच्या संयोगाने मसाले भात तयार केला जातो. महाराष्ट्राचा हा एक लोकप्रिय आणि पारंपारिक पदार्थ असून अनेक खास प्रसंगी मराठी घरात ही डिश आवर्जून तयार केली जाते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मसाले भात हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ आहे.
अनेक भाज्या घालून तयार केला जाणारा हा भात चवीसह आरोग्यासाठीही फायद्याचा ठरतो.
रुचकर आणि झटपट रेसिपी शोधत असाल तर मसाले भात तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.
महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीत मसाले भाताला एक खास स्थान आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा खास पाहुण्यांच्या जेवणात मसाले भात आवर्जून बनवला जातो. सुगंधी तांदूळ, ताज्या भाज्या, गोडा मसाला आणि संपूर्ण मसाल्यांचा अप्रतिम मिलाफ या पदार्थाला वेगळीच चव आणि सुगंध देतो. ही रेसिपीसोपी असून कमी वेळात तयार होते. घरगुती साहित्य वापरून अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा मसाले भात तुम्ही सहज बनवू शकता. जेवण काय बनवावे ते सुचत नसल्यास तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्रॉय करू शकता. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
तांदूळ स्वच्छ धुऊन २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा. नंतर पाणी काढून बाजूला ठेवा.
कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, तमालपत्र, दालचिनी, लवंगा, वेलदोडे आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. त्यानंतर काजू घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता.
आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर हिरव्या मिरच्या, बटाटा, गाजर, फरसबी आणि वाटाणे घालून ४ ते ५ मिनिटे परतून घ्या.
भाज्यांमध्ये हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत एक मिनिट परता.
भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने दोन मिनिटे परता. त्यानंतर गरम पाणी घालून सर्व साहित्य एकजीव करा.
कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत किंवा भांड्यात झाकण ठेवून मंद आचेवर भात पूर्ण शिजू द्या. शिजल्यानंतर ५ मिनिटे तसेच राहू द्या.
भात हलक्या हाताने मोकळा करा. वरून कोथिंबीर आणि किसलेले ओले खोबरे भुरभुरा. गरमागरम महाराष्ट्रीयन मसाले भात दही, पापड, लोणचे किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.
Web Title: Make maharashtrian authentic dish masale bhat at home recipe in marathi