Egg Bhurji Recipe : अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने,जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. स्ट्रीटवर मिळते तशी मसालेदार अंडा भुर्जी तुम्ही घरीदेखील अगदी सहज तयार करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
सकाळच्या नाश्त्यासाठी अंडा भुर्जी एक लोकप्रिय पदार्थ ठरतो.
तूपात भाजलेला पाव आणि त्याच्यासोबत भुर्जी.. हे काॅम्बीनेशनच न्यारं.
तुम्ही अगदी स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी घरीदेखील बनवू शकता.
भारतातील प्रत्येक शहरात रस्त्याच्या कडेला लागलेल्या फूड स्टॉलवर मिळणारी स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी ही अनेकांची आवडती डिश आहे. मसालेदार चव, बटरचा सुगंध, भरपूर कांदा-टोमॅटो आणि कोथिंबिरीची सजावट यामुळे ही भुर्जी साध्या घरगुती भुर्जीपेक्षा वेगळी आणि अधिक चविष्ट लागते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या झटपट जेवणापर्यंत कोणत्याही वेळी हा पदार्थ सहज बनवता येतो. घरच्या घरी अगदी हॉटेल किंवा स्टॉलसारखी चव मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात मसाले आणि अंडी जास्त शिजू न देणे महत्त्वाचे असते. काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपीपाहुणे आले असतील किंवा झटपट काहीतरी चविष्ट बनवायचे असेल, तर उत्तम पर्याय ठरते.