पायांवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी 'या' ५ रुपयांच्या पदार्थाचा करा वापर
सर्वच महिला त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी स्किन केअर प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेतली जाते तर कधी स्किन उजळदार दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन ब्राइटनिंग प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण यामुळे हातापायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष केले जाते. हातापायांची त्वचा काळी पडल्यानंतर सुद्धा त्वचेकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाय खराब होण्याची समस्या प्रामुख्याने उद्भवू लागते. याशिवाय नवीन चप्पल किंवा सँडलमुळे पायांना जखमा होतात. पायांना झालेल्या जखमा बऱ्या होतात पण त्वचेवर डाग तसेच राहतात.(फोटो सौजन्य – istock)
लांबलचक केसांसाठी मेथी दाण्यांच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांची होईल झपाट्याने वाढ
पाय स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडिक्युअर करून घेतात. यामुळे काही दिवस पाय अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. पण कालांतराने पायांची स्किन पुन्हा एकदा काळवंडून जाते. नेहमी नेहमी पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडिक्युअर करणे अनेकांना परवडत नाही. अशावेळी तुम्ही ५ रुपयांचा हा पदार्थ वापरून पायांची त्वचा उजळदार करू शकता. या पदार्थाच्या वापरामुळे पायांवर वाढलेले टॅनिंग कमी होईल.
चप्पल लागल्यानंतर पायांवर वाढलेले डाग कमी करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम किंवा लोशन उपलब्ध असतात. मात्र चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करून त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार होते. त्वचेवर आलेले डाग कमी करण्यासाठी बेकिंग सोडा आणि तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर होते.त्वचेचा काळवंडलेला रंग उजळदार करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करावा. चला तर जाणून घेऊया फेसपॅक तयार करण्याची कृती.
मोठ्या वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि शॅम्पू टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात १५ मिनिटं पाय बुडवून ठेवा. यामुळे पायांवर जमा झालेली डेड स्किन निघून जाईल आणि पाय स्वच्छ होण्यास मदत होईल. बेकिंग सोडा त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. त्यानंतर ब्रशच्या मदतीने पाय हळुवार हाताने घासून घ्या. यामुळे पायांमध्ये साचलेली घाण स्वच्छ होईल.
Ice Bath Therapy म्हणजे काय? जाणून घ्या आईस बाथ थेरपी केल्यामुळे आरोग्याला होणारे आशचर्यकारक फायदे
त्यानंतर पायब स्क्रब करण्यासाठी वाटीमध्ये चमचाभर कॉफी पावडर, तांदळाचे पीठ, मध आणि लिंबाचा रस घेऊन मिक्स करा. त्यानंतर तयार केलेला स्क्रब पायांवरचोळून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे पायांवर जमा झालेली त्वचा स्वच्छ होईल. त्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास पाय स्वच्छ होण्यास मदत होईल.