Maharashtra Breaking News Updates Today:
Jayant Patil On Fadnavis Meeting: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांही रंगल्या होत्या. अशातच या भेटीसंदर्भात आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
सुत्रांच्या हवाल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या तीनही नेत्यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘तटकरे आणि पटेल यांच्यासोबत माझी बैठक झाली नाही’ असं म्हटलं आहे.
15 Jul 2026 06:57 PM (IST)
क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेली आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२७ (ICC Mens ODI World Cup 2027) आता नव्या स्वरूपात खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२७ च्या विश्वचषकाआधी स्पर्धेच्या स्वरूपात अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत १४ संघ सहभागी होतील. परंतु विश्वचषकापर्यंतचा मार्ग आता पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक असणार आहे.
15 Jul 2026 06:47 PM (IST)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी (ता. १५) दिवसभर अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस पुणे परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची आणि दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हलक्या ते अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
15 Jul 2026 06:38 PM (IST)
ST Bus Fare Hike News Marathi : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) वाढत्या डिझेल दरांचा आर्थिक भार लक्षात घेऊन 10 टक्के हंगामी भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लागू करण्यात आलेली ही भाडेवाढ संपुष्टात येणार होती. मात्र, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे एसटीच्या परिचालन खर्चात मोठी वाढ झाल्याने महामंडळाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
15 Jul 2026 06:19 PM (IST)
नवी दिल्ली : महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना ही देशाच्या दृष्टीने महत्वाची असलेली विधेयकं संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात पारित होतील, असा विश्वास ‘एनडीए’तील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
15 Jul 2026 06:11 PM (IST)
ICC Annual Meeting/T20 World Cup 2028: आयसीसीची महत्वाची बैठक नुकतीच 2028 मध्ये पार पडणार आहे. 2028 मध्ये पुढील टी 20 वर्ल्डकप होणार आहे. त्याआधी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कपच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सेमीफायनलआधी दोन एलिमिनेटर सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्डकप अधिक रोमांचक होणार आहे.
15 Jul 2026 06:04 PM (IST)
काही दिवसांपूर्वी राज्यभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागांत पूरसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली. या पावसामुळे धरणे आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही काळासाठी दूर झाली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे.
15 Jul 2026 05:55 PM (IST)
काही दिवसांपूर्वी राज्यभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर काही भागांत पूरसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली.
15 Jul 2026 05:42 PM (IST)
महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने आज आपल्या पुढील पिढीतील कंपोझिट एलपीजी सिलेंडर ब्रँड “एचपी नव्या” चे शुभारंभ केले. या लाँचमुळे नवोन्मेष आणि ग्राहकांच्या सोयीसुविधांप्रती कंपनीची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे.
15 Jul 2026 05:40 PM (IST)
पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी-शोएब अख्तर यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यासह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताला ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव, आरव्हीएस मणी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पत्रकारांवर ड्रग्ज पुरवल्याचा आरोप केला आहे.
15 Jul 2026 05:33 PM (IST)
पाकिस्तानी खेळाडूंवर खराब कामगिरी आणि मॅच-फिक्सिंगचे अनेक आरोप झाले आहेत. पण आता आणखी एक घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे ज्यामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.
15 Jul 2026 05:22 PM (IST)
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
15 Jul 2026 05:15 PM (IST)
शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कौटुंबिक वादाला आता मोठे कायदेशीर वळण लागले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील एकूण ७ सदस्यांविरुद्ध पोलिसांत गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली असून, न्यायालयाने त्यांना तूर्तास कोणताही अंतरिम दिलासा दिलेला नाही.
15 Jul 2026 05:12 PM (IST)
मुंबई: शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कौटुंबिक वादाला आता मोठे कायदेशीर वळण लागले आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील एकूण ७ सदस्यांविरुद्ध पोलिसांत गंभीर तक्रार दाखल केली आहे.
15 Jul 2026 04:59 PM (IST)
केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अनेकांना वाटतं की हा आयोग फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी असतो. पण सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत गॅझेटनुसार यावेळी फक्त बेसिक सॅलरीच नाही, तर विविध भत्ते, HRA, पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि कामकाजाच्या पद्धतीतसुद्धा मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
15 Jul 2026 04:48 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालकेतील पहिला सामना मंगळवारी (दि. १४) खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ६ विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४७.५ षटकांत २५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४५.२ षटकांत चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार शुभमन गिलच्या शानदार खेळीमुळे आणि अक्षर पटेलच्या दमदार अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तब्बल ११ वर्षानंतर एड्जबॅस्टनवर इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाने इतिहास रचला.
15 Jul 2026 04:40 PM (IST)
देशात सायबर गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, आता त्यांनी थेट लोकप्रतिनिधींनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. केरळमधील काँग्रेस आमदार विद्या बालकृष्णन (Vidya Balakrishnan) यांना थेट मंत्रिपदाचे आमिष दाखवून तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, महिला आमदाराच्या प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे सायबर फसवणुकीचा हा मोठा डाव उलथवून लावण्यात यश आले आहे. याप्रकरणी सायबर सेलमध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
15 Jul 2026 04:30 PM (IST)
वॉशिंग्टन : भारत पुन्हा एकदा अमेरिकेच्या निशाण्यावर आला आहे. रशियाकडून तेल खरेदीवरुन अमेरिका कारवाई करण्याच्या तयारीत असून भारतावर आणि आणखी काही देशांवर १००% टॅरिफ लादण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेन सिनेटमध्ये रशियावरील निर्बंधांशी संबंधित एक नवे विधेयक मांडण्यात आले आहे. यामध्ये भारतासह चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या देशांचा समावेश आहे.
15 Jul 2026 04:20 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेत केवळ दोनच सामने बाकी आहेत. पहिल्या सेमिफायनल सामन्यात स्पेनने फ्रान्सचा २-० ने पराभव केला. स्पेनने फ्रान्सचे सलग तिसऱ्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.परंतु, किलियन एम्बाप्पेची सर्वात मोठी वैयक्तिक लढाई अजून संपलेली नाही. फ्रान्स स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, एम्बाप्पे गोल्डन बूटसाठी एक प्रबळ दावेदार आहे. तिसऱ्या स्थानासाठी फान्स पुन्हा एकदा भिडणार आहे. एम्बाप्पेला या सामन्यात इतिहास रचण्याची शेवटची संधी असेल. सध्या मेस्सी आणि एम्बाप्पे हे दोघेही गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
15 Jul 2026 04:10 PM (IST)
चाकण एमआयडीसी औद्योगिक वसाहतीच्या फेज-२ परिसरातील हजारो कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधेमुळे दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढत होता, तर अनेकांना वेळेवर कामावर व शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण होत होते.
15 Jul 2026 04:00 PM (IST)
काही दिवसांपूर्वी अशी अपडेट समोर आली होती की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन आयआरसीटीसी वेबसाईट लाँच केली जाणार होती. आज 15 जुलै रोजी ही नवीन वेबसाईट लाँच केली जाणार होती. त्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांना नव्या वेबसाईटची प्रतिक्षा होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, नवीन वेबसाईट आज 15 जुलै रोजी लाँच केली जाणार नाही. या वेबसाईटच्या लाँचिंगसाठी थोडा वेळ लागू शकतो. यामुळे आता प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. आयआरसीटीसीची ही नवीन वेबसाईट कधी लाँच होणार आणि नव्या वेबसाईटसाठी प्रवाशांना किती वाट पाहावी लागणार, याबाबत आता जाणून घेऊया.
15 Jul 2026 03:55 PM (IST)
आजच्या व्हॉट्सऍप संदेशांच्या आणि सोशल मीडियाच्या झपाट्याच्या युगात, साध्या पिवळ्या पोस्टकार्डनि महाराष्ट्रातील आदिवासी भागात पुन्हा इतिहास घडवला आहे. लाखो आदिवासी मुलांनी आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकणाऱ्या एका मूलभूत हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवला आहे.३ ते १८ वर्षांपर्यंत सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी हा लढा सुरू आहे. सोमवारी या मुलांच्या आशा, अपेक्षा आणि भावनांनी भरलेल्या हजारो पोस्टकार्डानी अखेर मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयाचे (सीएमओ) दार ठोठावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून पाठवण्यात आलेल्या सहा मोठ्या पोत्यांमध्ये भरलेली हजारो पोस्टकार्ड कार्यालयात पोच झाली असून त्यांची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:50 PM (IST)
Japan undersea gold reserve discovery : सध्या भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले असून ते प्रति तोळा १,४०,००० रुपयांच्याही पार गेले आहेत. अशा अत्यंत महागड्या काळात जर एखाद्या देशाला सोन्याचा अफाट साठा सापडला, तर त्या देशाचे नशीब रातोरात बदलू शकते. असाच काहीसा प्रचंड जॅकपॉट आता जपान या देशाच्या हाती लागला आहे. जपानी (Japan) शास्त्रज्ञांनी आपल्या सागरी सीमेमध्ये एक ऐतिहासिक आणि अत्यंत विस्मयकारक शोध लावला आहे. समुद्राच्या अथांग गर्भात, पृष्ठभागापासून तब्बल ७०० ते ७५० मीटर खोलीवर सोन्याचा एक विशाल आणि दुर्मिळ खजिना शोधण्यात संशोधकांना मोठे यश आले आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:45 PM (IST)
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्याने निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उपचारादरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांचे चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. त्यांना लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला समोर आले आहे. घडलेली घटना नागपूरच्या वानाडोंग्री परिसरात घडली. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:40 PM (IST)
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आता सत्ताधारी पक्ष आणि सर्व विरोधी पक्ष संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या आगामी अधिवेशनासाठी काँग्रेसने 16 जुलै रोजी काँग्रेस संसदीय रणनीती गटाची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:35 PM (IST)
अमेरिकेने १४ जुलैच्या मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात इराणच्या २६० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. अमेरिकेने हा आतापर्यंत सर्वात भयानक हल्ला केला असून जखमींची संख्या सर्वाधिक आहेत. सध्या मृतांची संख्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. हे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले असून जोपर्यंत अमेरिका त्यांच्यांवरील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत प्रतिहल्लेही थांबणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.
15 Jul 2026 03:30 PM (IST)
ब्रिटनमधून (UK) एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त बातमी समोर येत आहे. पीटरबरो (Peterborough) शहरातील न्यू इंग्लंड कॉम्प्लेक्समध्ये असलेले, तब्बल ४० वर्षे जुने ऐतिहासिक ‘भारत हिंदू समाज’ (Bharat Hindu Samaj) राम मंदिर आता एका मोठ्या कायदेशीर आणि धार्मिक संकटात सापडले आहे. पीटरबरो सिटी कौन्सिलने एका स्पर्धात्मक बोली प्रक्रियेनंतर या मंदिराची जमीन थेट ‘यूके इस्लामिक मिशन’ (UKIM) या मुस्लिम संघटनेला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण यूकेमधील ब्रिटिश हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, कारण या जागेवर आता मशीद (Masjid Khadijah) आणि मदरसा बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:25 PM (IST)
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिका सतत इराणविरोधात लष्करी कारवाई करत असून यामध्ये ७ सैनिक ठार झाल्याचा दावा इराणने केला आहे. इराणने दिलेल्या माहितीनुसार, एका लष्करी तळावर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्यांचे सात सैनिक ठार झाले आहेत. अमेरिका भ्याड हल्ल्या करत असून त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम आम्ही करत आहोत असे इराणने म्हटले आहे.
15 Jul 2026 03:20 PM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) तणावाने आता अत्यंत भीषण आणि धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेने इराणच्या हुकूमशाही आणि आक्रमक कारवायांना अत्यंत कठोर लष्करी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ’ (Strait of Hormuz) इराणी लष्करी तळांवर तब्बल सात तास सलग आणि विध्वंसक बॉम्बहल्ला केला आहे. व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि इराणच्या आक्रमकतेला पूर्णपणे लगाम घालणे हा या ऐतिहासिक लष्करी कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:15 PM (IST)
Chery-या चायनीज ऑटोकंपनीने आपल्या iCar ब्रँडने आपल्या ऑफ-रोड SUV सेगमेंटचा विस्तार करत नवीन iCar V25 सादर केली आहे. ही नवीन हायब्रिड SUV कॉम्पॅक्ट V23 आणि फ्लॅगशिप V27 च्या दरम्यान पोझिशन करण्यात आली असून, यात REEV तंत्रज्ञान, मोठा आकार, LiDAR सपोर्ट आणि तब्बल १,८०० किलो वजन खेचण्याची क्षमता मिळते. जिथे भारतात महिंद्रा थार सारख्या ऑफ रोडींग गाड्यांचा बोलबाला आहे; तिथे ही icar V25 या भारतात स्थित ऑफ रोडींग कारला टक्कर देईल, असे भाकीत वर्तवले जात आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:10 PM (IST)
पुण्यातील सहकारनगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही तरुणांनी दुचाकींवरून येत एका गृहनिर्माण सोसायटीत प्रवेश केला आणि काही मिनिटांतच परिसरात गोंधळ घालत उभ्या वाहनांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत 18 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 03:05 PM (IST)
China Detained US Scientist : बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनने अमेरिकन नागरिक आणि प्रसिद्ध भूकंपशास्त्रज्ञ, यूलिन चेन यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून ते चीनच्या ताब्यात असून त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर खटला सुरु असून त्यांना जन्मठेप किंवा फाशी होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
15 Jul 2026 02:56 PM (IST)
पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झालीय का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण काल कोथरुडमध्ये ज्या अमित शिंदे वर कोयत्याने वार करण्यात आला तो निलेश घायवळच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने अमित शिंदे यांच्या कोथरुड मधील मोबाईल दुकानातून सीम कार्ड घेतले होते. पोलिस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अमित शिंदेवर काल कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला निलेश घायवळच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी आहे.
15 Jul 2026 02:45 PM (IST)
नीट पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप कायम असतानाच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ६ लाखांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरवणारी प्रश्नपत्रिका छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांत बाहेर काढून विकण्यात आल्याचा मोठा खुलासा तपासातून झाला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
15 Jul 2026 02:36 PM (IST)
पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता केवळ लोकनियुक्त लोकप्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे पुणे जिल्हा परिषदेत आता तब्बल ७ स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. या नव्या नियमांमुळे वकील, डॉक्टर, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
15 Jul 2026 02:25 PM (IST)
'डिलिमिटेशनचं बिल आमच्याकडे आलं नाही, बिल आल्यावर २४ तासात अभ्यासकरून भूमिका मांडू, सरकारकडून आलेल्या विधेयकात ५०% जागा वाढत असताली तर विचार करू अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.
15 Jul 2026 02:14 PM (IST)
केंद्र सरकारने डिलिमिटेशनचा अधिकृत प्रस्ताव आणि फॉर्म्युला जाहीर केल्यानंतरच भूमिका स्पष्ट केली जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ नये, सर्व पक्षांशी चर्चा व्हावी आणि जागावाढीबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
15 Jul 2026 02:05 PM (IST)
मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. आग इतकी भीषण होती की वाहन पूर्णतः जळून गेले. बोगद्यात धूर पसरल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशांतील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून परिसरात मोठी कोंडी झाली आहे.
15 Jul 2026 01:55 PM (IST)
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर बांगलादेशच सरकारची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. हसीना यांच्या परतीच्या निर्णयाचे स्वागत बांगलादेशने केले आहे. परंतु त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच हसीना यांना सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो असेही संकेत ढाका सरकारकडून मिळाले आहेत.
15 Jul 2026 01:45 PM (IST)
आजच्या काळात नोकरी किंवा इंटर्नशिप शोधणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. प्रत्येक एका जागेसाठी हजारो अर्ज येतात आणि कंपन्या आता हे अर्ज वेगाने तपासण्यासाठी एआयचा (AI) वापर करत आहेत. अशा परिस्थितीत, फक्त एक चांगला रिज्युमे असणे पुरेसे नाही, तर तुमचे प्रोफाईल इतर उमेदवारांपेक्षा वेगळे आणि प्रभावी दिसणे देखील गरजेचे आहे. याच कारणामुळे आता चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि गुगल जेमिनी यांसारखी एआय टूल्स विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठे मदतनीस ठरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया की करिअरशी संबंधित उत्तम सल्ला मिळवण्यासाठी ओपन एआयला नेमके कोणते ५ प्रश्न विचारले पाहिजेत.
15 Jul 2026 01:35 PM (IST)
अन्न भेसळीविरोधात मोठ्या कारवाईत, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात दुधातील भेसळीचे आंतर-जिल्हा रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली असून २ कोटी रुपयांपेक्षा जास्त (अंदाजे २० दशलक्ष डॉलर्स) किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एफडीएने संयुक्तपणे मंचर (या रॅकेटचे मुख्य केंद्र मानले जाते), तसेच अकलूज, अहिल्यानगर, सिल्लोड आणि सांगली येथे छापे टाकले. ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ३० सदस्यीय पथकाने केली, ज्यांना एफडीएच्या २० हून अधिक अधिकाऱ्यांनी मदत केली.
15 Jul 2026 01:25 PM (IST)
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या तेजश्रीने नुकतीच एक आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली असून, महिन्याभरानंतर तिने सोशल मीडियावर नव्या गाडीची पहिली झलक दाखवली आहे. तेजश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असून तिचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे.
15 Jul 2026 01:15 PM (IST)
परळ येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रेल्वेची अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वीच गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे कॉलनीतील रहिवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेने चौकशी केली असता, रेल्वेच्या जागेवर परवानगीशिवाय मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मंडळाने १३ जून रोजी गणेशोत्सवासाठी मंडप उभारणे, गणेशमूर्ती साकारणे आणि स्थापना करण्यासाठी मध्य रेल्वेकडे परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वीच मूर्ती साकारण्याचे काम सुरू झाल्याने नियमपालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
15 Jul 2026 01:05 PM (IST)
अयोध्या राम मंदिर देवस्थानच्या दानचोरी प्रकरणात, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी पहिल्यांदाच सुमारे ३ कोटी रुपयांचा चंदा चोरीला गेल्याचे मान्य केले आहे. आतापर्यंत ते चोरी झाल्याचे स्वीकारत होते. परंतु, स्पष्टपणे काहीही सांगणे टाळत होते. आता पोलिसांनी २ कोटींपेक्षा जास्त रोकड आणि दागिने जप्त करत कोट्यवधी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी सुरू केली. तेव्हा गिरी यांना इतक्या मोठ्या रकमेची चोरी मान्य करणे भाग पडले. मात्र, १४ कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची बातमी चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
15 Jul 2026 12:40 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना डॅलस स्टेडियमवर स्पेन आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला. स्पेनने दोन्ही हाफमध्ये वर्चस्व गाजवले आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पेलाही चांगली कामगिरी करू दिली नाही. स्पेनने २-० असा विजय मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात स्पेनने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, २०१० च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात पोहोचून त्यांनी ट्रॉफी जिंकली होती. यावेळी, त्यांचा सामना गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.
15 Jul 2026 12:35 PM (IST)
नागपूर येथून एक दुर्दैवी धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी स्थानकाच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढलेल्या एका अज्ञात तरुणाचा हाय व्होल्टेज ओव्हरहेड विजेच्या तारेचा धक्का लागल्याने जागीच होरपळून मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाचला नाही. ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.सध्या आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) या प्रकरणाचा तपास करत आहेत.
15 Jul 2026 12:30 PM (IST)
शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर आहेत. त्यांचे उपोषण सक्तीने संपवून त्यांना अन्न पुरवावे, यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, त्यांचे वजन ८.५ किलोग्रॅमने कमी झाले असून, दोन दिवसांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
15 Jul 2026 12:25 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 61व्या वर्षी त्याने गौरी स्प्रॅटसोबत लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्यावर ‘लव्ह जिहाद‘चे आरोप केले आहेत. दुसरीकडे, काही मुस्लिम धर्मगुरूंनीही या विवाहावर आक्षेप घेत फतवा जारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
15 Jul 2026 12:15 PM (IST)
मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच ज्या प्राण्याबद्दल सर्वात जास्त गूढ, भीती आणि आकर्षण राहिले आहे, तो प्राणी म्हणजे ‘साप’. सापाचे नाव काढताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण खरंच साप इतके भयानक आणि जीवघेणे असतात का? की आपल्या मनात घर करून बसलेली भीती आणि अंधश्रद्धा याला कारणीभूत आहे? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि सापांच्या संवर्धनाबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ जुलै रोजी ‘जागतिक सर्प दिन’ (World Snake Day) साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला हे पटवून देण्याची संधी देतो की, साप हे पृथ्वीवरील जैवविविधतेचे आणि आपल्या निसर्गाचे अत्यंत महत्त्वाचे रक्षक आहेत.
15 Jul 2026 12:10 PM (IST)
डिजिटल युगात डेटाची गरज जितक्या वेगाने वाढत आहे, तितक्याच वेगाने देशात डेटा सेंटर्सचे नेटवर्कही विस्तारत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे भारताचे डेटा सेंटर क्षेत्र आता झपाट्याने प्रगती करत आहे. याच कारणामुळे येत्या काही वर्षांत हे क्षेत्र केवळ तांत्रिक विकासापुरते मर्यादित न राहता, लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी घेऊन येणार आहे. एका नवीन अहवालानुसार, वर्ष २०३० पर्यंत भारताच्या डेटा सेंटर उद्योगात सुमारे १ लाख इंजिनिअर्स आणि तांत्रिक व्यावसायिकांची गरज भासणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे क्षेत्र इतक्या वेगाने का वाढत आहे आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची सर्वाधिक मागणी असणार आहे.
15 Jul 2026 12:05 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील एका मोठ्या निर्णयावर यु-टर्न घेतला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्याच्या बदल्यात २०% टोल वसूल करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता ट्रम्प यांनी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु इराणची नाकेबंदी सुरुच राहिल असाही इशारा त्यांनी दिला.



