(फोटो सौजन्य: Pinterest)
मिल्क फॅब्रिक तयार करण्याची विलक्षण प्रक्रिया
दूध खराब झाल्यावर त्यातील केसीन हे प्रोटीन वेगळे काढले जाते. हे प्रोटीन पाण्यात मिसळून एक द्रव स्वरूप तयार केले जाते. हा द्रव स्पिनिंग मशीनमधून फिरवला असता त्याचे सूक्ष्म, रेशमासारखे चमकदार तंतू तयार होतात. या तंत्यांपासून मग कापड विणले जाते. पूर्ण प्रक्रियेत कोणतेही हानिकारक केमिकल्स वापरले जात नाहीत, म्हणून हे कापड १००% नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक मानले जाते.
या प्रक्रियेतील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यासाठी लागणारे दूध. १ लिटर दुधापासून फक्त १० ग्रॅम तंतू तयार होतात. त्यामुळे एकच टी-शर्ट तयार करण्यासाठी तब्बल ६०–७० लिटर दूध लागतं. उत्पादन मेहनतीचं असल्याने त्याची किंमतही उच्च दर्जाची असते—१ मीटर मिल्क फॅब्रिक १५ ते ४५ हजार रूपयांपर्यंत, तर त्यापासून तयार केलेली साडी ३ ते ५ लाखांपर्यंत विकली जाते.
इतिहासातही होती दुधाच्या कापडाची छाप
दुधापासून कापड तयार करण्याची कल्पना नवी वाटत असली तरी तिचे मूळ १९३० च्या दशकात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटलीमध्ये उलन उपलब्ध नसल्याने तिथल्या वैज्ञानिकांनी दुधातील प्रोटीन वापरून ‘लॅनिटल’ नावाचे तंतू विकसित केले. युद्ध संपल्यावर उलन आणि सिंथेटिक तंतू सहज उपलब्ध झाल्याने ही तंत्रज्ञान मागे पडले. मात्र आजच्या सस्टेनेबल फॅशनच्या काळात पुन्हा त्याच कल्पनेचा आकर्षक अविष्कार झाला आहे.
सध्याच्या काळातील मागणी आणि वैशिष्ट्ये
जर्मनीतील QMilk ही कंपनी आज या तंत्रज्ञानात अग्रस्थानी आहे. ते फक्त वाया जाणारे किंवा नासलेले दूध वापरतात, त्यामुळे हे उत्पादन पर्यावरणास पूरक ठरते. मिल्क फॅब्रिकचे वैशिष्ट्ये खरोखरच उल्लेखनीय आहेत –
दूधापासून कापड बनवण्याची ही कल्पना फक्त फॅशनपुरती मर्यादित नाही, तर पर्यावरणासाठीही महत्त्वपूर्ण आहे. वाया जाणारे दूध उपयोगात आणून मूल्यवर्धित उत्पादन तयार करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. जागतिक बाजारात सस्टेनेबल फॅब्रिक्सची मागणी वाढत असताना, मिल्क फॅब्रिक हे निश्चितच भविष्याच्या फॅशनला नव्या दिशा देणारे तंत्रज्ञान ठरते.






