कोणत्या स्ट्रीट फूडमुळे आतड्यांची होते हानी (फोटो सौजन्य - iStock)
बहुतेक लोकांना मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असते. विशेषतः रस्त्यावरील पदार्थ लोकांना खूप आवडतात. लोक आठवड्यातून २ ते ३ वेळा स्ट्रीट फूड नक्कीच खातात. पण तुम्हाला माहिती आहे का की रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्याने आतड्यांना नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणते रस्त्यावरील पदार्थ आतड्यांना हानी पोहोचवू शकतात. आपण हल्ली जंक फूड, फास्ट फूड आणि स्ट्रीट फूड इतक्या प्रमाणात खातो की आपल्या शरीराचे भाग पोखरले जात आहेत याची जाणीवही होत नाही.
कोणते स्ट्रीट फूड्स आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात याबाबत आपण आज अधिक माहिती घेऊया. खरं तर पाणीपुरी, पावभाजी, पिझ्झा याशिवाय राहणं म्हणजे हल्ली कठीण झालंय. पण याचे परिणाम काय होतात आधी जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
समोसा आणि कचोरी
तळलेल्या समोसा – कचोरीने होणारा त्रास
संध्याकाळी चहासोबत समोसा खायला कोणाला आवडत नाही? कारण ज्या तेलात समोसा बनवला जातो ते तेल पुन्हा पुन्हा गरम केले जाते. तेल वारंवार गरम केल्याने ते खराब होते जे आतड्यांना हानी पोहोचवू शकते. तुम्ही संध्याकाळी वा सकाळी नेहमी समोसे आणि कचोरी खात असाल तर तुमच्या आतड्यांना त्रास होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.
रात्री केलेल्या चुका सडवू शकतील तुमचे आतडे, समजल्यावर त्वरीत बदला सवय
पाणीपुरीचे सेवन
रस्त्यावरील पाणीपुरीमुळे होणारे आतड्यांचे नुकसान
पाणीपुरी आवडत नाही असा माणूस मिळतेच विरळा. बहुतेक लोक बरेचदा संध्याकाळी पाणीपुरी खातात. घाणेरडे हात, रसायने असलेले पाणी आतड्यांना हानी पोहोचवू शकते. पाणीपुरी खाल्ल्याने पोटात संसर्ग आणि आतड्यांमध्ये जळजळ होऊ शकते. अनेकदा रस्त्यावर कुठेही पाणीपुरी खाल्ली तर त्यात कोणते पाणी असते याबाबत आपल्याला माहिती नसते आणि सतत पाणीपुरी खाल्ल्यास आतड्यांना हानी पोहचते.
चायनीज स्ट्रीट फूड्स
चाजनीज पदार्थांमधील विविध सॉस
आजकाल, रस्त्यावरील पदार्थांमध्ये चायनीज पदार्थ सहज आढळतात. चायनीज पदार्थांमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि पीठ वापरले जाते, ज्यामुळे पोटात जळजळ आणि आम्लपित्त समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अजिनोमोटोमुळे शरीरावर विविध परिणाम होतो आणि आतडी लवकर खराब होतात. त्यामुळे चायनीज पदार्थांपासून दूर रहा
आतड्यांना हळूहळू सडवतात ‘हे’ पदार्थ, तुम्ही करत आहात खाण्यात चुका
बटाट्याची टिक्की आणि दही भले
रस्त्यावरील तळलेल्या टिक्की
दह्यापासून बनवलेले रस्त्यावरील पदार्थ आतड्यांना त्रास देऊ शकतात. जास्त वेळ उघड्यावर ठेवलेल्या दह्यात बॅक्टेरिया वाढू लागतात, तर तेलात तळलेले बटाट्याचे टिक्की देखील आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चवीला चांगले लागत असले तरीही शरीरातील आतड्यांवर त्याचा दुष्परिणाम होताना दिसून येतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.