(फोटो सौजन्य – Pinterest)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी अखेर विवाहबंधनात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होती आणि आता त्यांनी शांत व आध्यात्मिक वातावरणात, तमिळनाडूमधील लिंगा भैरवी मंदिरात अतिशय साधेपणाने लग्न केले. माध्यमातील माहितीनुसार, त्यांच्या या खास समारंभाला केवळ ३० लोक उपस्थित होते. सामंथाने या प्रायव्हेट वेडिंगसाठी लाल रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. काही वेळापूर्वीच तिने आपल्या इंस्टाग्रामवर विवाहाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.
Top Travel Spots: ‘ही’ 15 ठिकाणे आयुष्यात एकदा तरी अवश्य पहावीतच; आजच बनवा Bucket list!
लिंगा भैरवी मंदिरात घेतले सात फेरे
कोयंबटूरजवळील ईशा योगा सेंटर परिसरात साधगुरू यांनी स्थापित केलेले लिंगा भैरवी मंदिर शांत, पवित्र आणि ऊर्जायुक्त वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हे ठिकाण लोकांमध्ये आज अचानक चर्चेचा विषय ठरले. दोन्ही जणांनी याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा उरकला आणि अधिकृत छायाचित्रे समोर आल्यानंतर चाहत्यांचे लक्ष मंदिराकडेही वळले आहे.
देवी लिंगा भैरवी
ईशा फाउंडेशनच्या माहितीनुसार, हे मंदिर देवी लिंगा भैरवी यांना अर्पण केलेले आहे. देवीला स्त्रीशक्तीचे सामर्थ्यवान रूप मानले जाते. भक्तांच्या कल्याणासाठी, मानसिक बळासाठी आणि जीवनातील समृद्धीसाठी देवी कृपा करते, असा विश्वास येथे असलेल्या साधकांचा आहे.
मंदिराची वास्तुरचना
लिंगा भैरवी मंदिरात कसे पोहोचाल?






