(फोटो सौजन्य: meta ai)
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. हा महिना मराठी कॅलेंडरमधील पाचवा महिना आहे. या महिन्यात अनेक सण आणि व्रतवैकल्ये असतात. धार्मिक मान्यतेनुसार, हा महिना भगवान शिवाला समर्पित असून या महिन्यात शंकराची मनोभावनेने पूजा केली जाते आणि शिवमंदिरांना भेट दिली जाते. अनेक भाविक काळात उपवास करून शिवलिंगाची पूजा करतात, असे केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली मनोइच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे.
या वर्षी श्रावण महिना ११ जुलैपासून सुरू होईल आणि ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालेल. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना पूजा आणि उपवास इत्यादींसाठी खूप शुभ मानला जातो. उपवासात अनेक गोष्टींचे सेवन करणे वर्ज्य असते ते तर तुम्ही ऐकलेच असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? या महिन्यात काही रंग देखील पूजेसाठी अशुभ मानले जातात ज्यामुळे हे रंग कधीही परिधान करू नयेत. भगवान शिवांनाही काही रंग खूप आवडतात, तर काही रंग शिवाला क्रोधित करतात. चला तर मग श्रावणात कोणते रंग परिधान करावेत आणि कोणते टाळावेत ते जाणून घेऊया.
ते रंग चुकूनही घालू नका
ज्योतिषशास्त्रानुसार, रंगांचा आपल्या जीवनावर खूप खोल प्रभाव पडतो आणि म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करताना, रंगांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्रावणात तीन रंग टाळले पाहिजेत, कारण हे रंग धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जात नाहीत. म्हणूनच, या काळात हे रंग परिधान करण्यास शास्त्रांमध्ये देखील मनाई आहे. यानुसार, काळा, तपकिरी आणि खाकी हे तीन रंग कधीही परिधान करू नयेत. केवळ श्रावणातच नाही तर धार्मिक उत्सवात देखील हे रंग कधीही घालू नयेत. हे रंग नकारात्मकता आणि अशुभतेचे लक्षण मानले जातात. श्रवणात विशेष करून जर तुम्ही जर पूजा करत असाल तर हे रंग चुकूनही घालू नका नाहीतर तुम्हाला पूजेचं फळ मिळणार नाही.
श्रावण महिन्यात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
श्रवणात शुभ मानले जाणारे रंग
श्रावण महिना हा हिरवळ आणि निसर्गाशी संबंधित आहे, जो जीवनात आनंद, समृद्धी, ताजेपणा आणि कल्याण आणतो. या काळात शुभ आणि सकारात्मक रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात नवीन ऊर्जा आणि आनंद येतो. या महिन्यात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. हा रंग भगवान शिव यांचा आवडता रंग आहे. तसेच, पांढरा रंग शांती, साधेपणा आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. याशिवाय, तुम्ही श्रवणात हिरवा, निळा आणि जांभळा असे रंगांसारख्या सुखदायक रंगांची निवड करू शकता.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.