फोटो सौजन्य - Social Media
दोन प्रेम करणाऱ्या जीवांना व्हॅलेंटाईन वीकची प्रतीक्षा असते. तसे प्रेम असेल तर रोजचाच दिवस आपल्यासाठी व्हॅलेंटाईन असतो म्हणा! परंतु, या दिवसात जोडपे एकमेकांच्या व्यस्थ जीवनातून एकमेकांसाठी जरा जास्त वेळ काढतात आणि आपल्या प्रेमाला व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे. पण त्याआधी ६ वेगवेगळ्या प्रेमाच्या दिवसांना साजरे केले जाते, त्यातील एक खास दिवस म्हणजे ‘Kiss Day!’ किस डे म्हणजेच एकाअर्थी चुंबन घेण्याचा दिवस असतो. जोडीदार एकेमकांना किस करत या दिवशी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतात. पण फक्त किसच नव्हे, जर तुम्हाला हा दिवस अविस्मरणीय आणि अदभुद करायचा आहे तर काही अनोख्या कल्पना आहेत, त्या नक्कीच फॉलो करा आणि तुमच्या पार्टनरला खुश करा.
तुम्हाला तुमचे नाते अधिक घट्ट करायचे असेल आणि या दिवसाला आणखीन सुंदर बनवायचे असेल तर हा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करा. एका सुंदर समुद्रकिनारी निळ्याभोर सागराच्या समोर किंवा हिरवेगार डोंगर माथ्यावर जाऊन सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहताना तुम्ही तुमच्या जोडीदाराला किस करत तुमच्या प्रेमाला व्यक्त करू शकता.
तुमच्या किस डेला आणखीन स्पेशल करण्यासाठी त्या गोड क्षणांना कॅमेरात टिपून ठेवा. या दिवशी एक सुंदरसा रोमँटिक फोटोशूट करा. या दिवसाच्या आठवणी नेहमी स्वतःकडे जपून ठेवण्यासाठी ही एक उत्तम कल्पना आहे. किस डे अधिक खास करण्यासाठी थीम डेट आयोजित करा. उदा. १९५०च्या दशकाची थीम, बॉलिवूड रोमँटिक थीम किंवा तुमच्या पहिल्या भेटीचे थीम. घरातच तुमच्या आवडीचे डेकोरेशन करा, कॅंडल लाइट डिनर ठेवा आणि त्या वातावरणात एक रोमँटिक किस शेअर करा.
तुमच्या जोडीदारासाठी एक सरप्राइझ ट्रेझर हंट तयार करा, जिथे वेगवेगळ्या ठिकाणी प्रेमभरल्या नोट्स ठेवा आणि शेवटी त्याला/तिला एका रोमँटिक किसने सरप्राइझ करा. हा अनोखा प्रयोग नक्कीच तुमच्या नात्यात अधिक गोडवा भरेल. मुळात, जर तुम्ही एका सुदंर ठिकाणी ट्रिप आयोजित करून त्याठिकाणी हे खास क्षण साजरे केले तर हा दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. महाबळेश्वर, गोवा किंवा कोकणातील शांत ठिकाणी ट्रिप आयोजित करून या खास क्षणांचा आनंद घ्या. या हटके कल्पनांद्वारे तुमचा किस डे अधिक रोमँटिक आणि संस्मरणीय होईल. प्रेमाचा हा दिवस खास करण्यासाठी या कल्पनांचा जरूर विचार करा!